पवार साहेबांचा परदेशातून फोन आला आणि मी क्षणात राजीनामा दिला...

विधान परिषदेच्या Legislative Council दहा आमदारांचा आज निरोप समारंभ पार पडला.
Vinayak Mete
Vinayak MeteSarkarnama

मुंबई : राज्यातील १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत दत्ता मेघे यांचा पराभव झाला. तरी त्यांना मंत्रीपद मिळाले. त्यावेळी मी आमदार होतो. पण, राष्ट्रवादीतील कोणीही मेघे यांच्यासाठी राजीनामा द्यायला तयार नव्हते. पवार साहेब त्यावेळी अमेरिकेत होते. त्यांनी तेथून मला फोन करून तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल, असे सांगितले होते. त्यावर तुम्ही पक्षप्रमुख आहात तुम्ही सांगाल ते होईल, असे म्हणत कोणताही विचार न करता मी राजीनामा दिला, अशी आठवण भाजपचे आमदार विनायक मेटे यांनी निरोपाच्या भाषणात विधान परिषदेच्या सभागृहात सांगितली.

विधान परिषदेच्या दहा आमदारांचा आज निरोप समारंभ आज होता. निरोपाच्या वेळी ते बोलत होते. यावेळी सभापती रामराजे नाईक निंबाळकर उपस्थित होते. विनायक मेटे म्हणाले, सगळ्यांच्या सहकार्याने स्मारक, आरक्षणासोबतच इतर प्रश्न सभागृहात मी मांडले. त्यामुळे मी सर्वांचे आभार मानतो. प्रश्न मांडण्यासाठी सदस्य या सभागृहात येत असतात. विचार मांडताना अनेक ठिकाणाहून हेटाळणी ऐकावी लागली. हेटाळणीपेक्षा गोरगरीबांचे प्रश्न मार्गी लावणे आवश्यक आहे.

Vinayak Mete
महाविकास आघाडीवर विनायक मेटे यांचा हल्लाबोल;पाहा व्हिडिओ

राज्य, देशात असणाऱ्या माणसांच्या सुखदुखाचा विचार त्यांच्यावरील अन्याय, अत्याचाराचा विचार मांडून त्यांना न्याय कसा मिळेल, त्यासाठी सातत्याने आवाज उठविला पाहिजे. मराठा महासंघातील आठवणी सांगताना विनायक मेटे म्हणाले, ''मराठा आरक्षणाचा विषय मांडताना अनेक राजकिय मंडळी हेटाळणी करत होती. वेळ देत नव्हते. कारण त्यांच्यासोबत उठलो बसलो तरी त्यांना त्रास होईल, ही भिती होती. मुळात आर्थिक दृष्ट आरक्षण मिळावे, ही भावना अण्णासाहेब पाटील यांच्यासोबत काम करताना आम्हाला समजली.

Vinayak Mete
मुख्यमंत्री ठाकरेंच्या मेहुण्यावर ईडीची कारवाई; शरद पवार म्हणाले...

ओबीसींची सगळी मंडळी अण्णासाहेबांच्या मोर्चा आमच्यासोबत होती. मंडल आयोगाच्या स्थापनेनंतर ही सर्व मंडळी वेगळी झाली. त्यापूर्वी सर्वजण लढा देण्यासाठी एकत्र होती. या प्रवासात राजकारण करायचा निर्णय घेतला त्यावेळी सुरवातील आमचा काँग्रेसकडे ओढा होता. पण काँग्रेसची मंडळी भेटपण देत नव्हती. ही गोष्ट कै. गोपीनाथ मुंडेसाहेबांना समजली. त्यांनी पुढे येत आम्हाला शिवसेना प्रमुख कै. बाळासाहेब ठाकरेंकडे घेऊन गेले.

Vinayak Mete
Shivsena : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या स्वभावाचा राष्ट्रवादी गैरफायदा घेत आहे...

महाराष्ट्रासाठी आपण एकत्र काम करू या असे सांगीतल आणि १९९५ मध्ये मराठा महासंघासोबत युती केली. त्यावेळी निवडणूक लढवली. मी आमदार झालो त्यावेळी आमच्यात मतमतांतर झाले. मला सत्ते येण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मदत केली. या प्रवासात कै. सुधीर जोशींची आठवण येते. अर्धी मते शिवसेना व भाजपने द्यायची ठरले होते. मी इतिहासात जात नाही. हा प्रवास ज्या विचाराने येथेपर्यंत आलो तो कसा वाढेल आणि त्याला चालना कशी मिळेल पहिले.

Vinayak Mete
केंद्राच्या नव्या अटीने ना मराठा आरक्षण, ना ईडब्ल्यूएसचा उपयोग अशी अवस्था..

यापुढे ही मराठा समाजाला सोबत घेऊन वाटचाल करणार आहोत. खासदार शरद पवार, कै. गोपीनाथ मुंडे, कै. आबा या सर्वांचे प्रेम मला मिळाले. अजित दादांचे तर मोलाचे मार्गदर्शन लाभले. आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी प्रामाणिक राहायचे असे मी ठरविले होते. आता मी भाजप सोबत असून येथेही प्रामाणिकपणे काम करत आहे. त्यामुळे माझे सर्वांशी सलोख्याचे संबंध आहेत.

Vinayak Mete
फडणवीस म्हणाले, आता मिशन महाराष्ट्र; तर गडकरी म्हणाले, महापालिका जिंका...

या सगळ्यांचे ऋण व्यक्त करणे मला गरजेचे वाटते. १९९९ मध्ये मेघे साहेबांचा पराभव झाला त्यावेळी मी आमदार होतो. पण, राष्ट्रवादीतील कोणीही राजीनामा द्यायला तयार नव्हते. पवार साहेब त्यावेळी अमेरिकेत होते. त्यांनी तेथून मला फोन केला. तुम्हाला राजीनामा द्यावा लागले. देऊ शकाल का, असे विचारले. त्यावेळी तुम्ही पक्ष प्रमुख आहात तुम्ही सांगाल ते होईल, असे म्हणत कोणताही विचार न करता मी राजीनामा दिला. त्यानंतर अजित पवार, आर. आर आबांच्यासोबत ही मी हे पाळले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com