हल्ल्यानंतर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया : म्हणाले, "एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी पण..."

ST Strike | Sharad Pawar : आक्रमक आंदोलकांची शरद पवारांच्या निवासस्थानी चप्पलफेक आणि दगडफेक
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama

मुंबई : राज्यात चालू असलेले एसटी कर्मचाऱ्यांचे (ST Workers) आंदोलनाने आज नाट्यमय वळण घेतले. काल उच्च न्यायालयाने (High Court) एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनकरणाची मागणी फेटाळत २२ एप्रिलपर्यंत त्यांना कामावर रुजू होण्याचे आदेश दिले. पण त्यांना निवृत्ती वेतन आणि ग्रॅच्युएटी अशा सुविधा देण्याचे आदेश दिले. परंतु या निर्णयावर कमालीचे नाराज होत विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम राहत आझाद मैदानात असलेले एसटी कर्मचारी आज आक्रमक झाले.

या आक्रमक कर्मचाऱ्यांनी आज दुपारी ३ वाजून ४५ मिनीटांच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानी धाव घेत आंदोलन केले. पवार यांच्या 'सिल्वर ओक' या निवासस्थानाबाहेर कर्मचाऱ्यांचे हे आंदोलन केले. या आंदोलना दरम्यान काही आंदोलकांनी निवासस्थानावर दगडफेक आणि चप्पलफेक सुरु केली. तसेच शरद पवार यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरु केली. मात्र पोलिसांनी तात्काळ आंदोलनस्थळी धाव घेवून आंदोलकांना ताब्यात घेतले.

Sharad Pawar
Silver Oak Attack : देवेंद्र फडणवीस राज्यपाल कोश्यिारींच्या भेटीला; तर्कवितर्कांना उधाण

या हल्ल्यानंतर आता शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया आली असून त्यांंनी आपण एस.टी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले, आपण कर्मचाऱ्यांच्या मागे आहे, मात्र चुकीच्या नेतृत्वाच्या मागे नाही. जर कोण चुकीच्या रस्त्यावर जात असेल तर त्यांना योग्य मार्ग दाखविण्याचे काम तुमचे माझे सर्वांचे आहे. पण आज जे काही घडले त्याबाबत जास्त आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. कारण नेता शहाणा नसला तर की कार्यकर्त्यांवर दुष्परिणाम होतो याचे उदाहरण आहे, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्रात राजकारणात मतभेद असतो, संघर्ष असतो. पण टोकाची भूमिका घेण्याची परंपरा नाही. पण गेले काही दिवस एस्टी कर्मचारी सांगण्याचा जो प्रयत्न झाला तो अशोभनीय होता. माझे आणि एसटी कर्मचाऱ्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. मागील ४० ते ५० वर्षांपासून त्यांचे एकही अधिवेशन चुकविले नाही. ज्या ज्या वेळी प्रश्न निर्माण झाले त्यावेळी ते सोडविण्यासाठी सर्व सहकाऱ्यांनी हातभार लावला. पण याचवेळी त्यांना चुकीचा मार्ग दाखविण्यात आला. त्यांचे दुष्परिणाम आता दिसत आहेत. कारण नसताना एसटी कर्मचारी काही महिने घरापासून लांब राहिला. त्यामुळे प्रचंड आर्थिक संकट त्यांच्या कुटुंबावर आली आहे, असेही पवार म्हणाले.

Sharad Pawar
Silver Oak Attack : न्यायालयाचा निर्णयानंतर पेढे वाटणाऱ्यांनी आज पवारांच्या घरावर दगडफेक का केली?

दुर्देवाने काही कर्मचाऱ्यांना टोकाची भूमिका घ्यावी लागली. पण ज्या नेतृत्वाने अशी टोकाची भूमिका घेण्यासाठी परिस्थीती निर्माण करते तेच नेतृत्व आत्महत्येसारख्या निर्णयाला जबाबादार आहे. त्यातुन जे काही नैराश्य आले ते नैराश्य आता कुठेतरी काढलं पाहिजे म्हणूनच आज इथे टार्गेट करण्यात आले. दुसरं त्यामध्ये काही नाही, अशीही प्रतिक्रिया पवार यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com