'शिंदे माझे सासरे..' ; पवारांच्या विधानावर फडणवीस म्हणाले, "आता सासरच्या माणसांना कोण टाळू शकतं ? "

MCA : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीसाठी शरद पवार,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिग्गज प्रथमच एका मंचावर एकत्र आले.
 MCA latest new
MCA latest new sarkarnama

मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) अध्यक्षपदासाठी आज निवडणूक होणार आहे. यासाठी 380 जण मतदानाचा हक्का बजावणार आहेत. या निवडणुकीनिमित्त महाराष्ट्रातील राजकारणी एकाच मंचावर आले आहेत.यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी जोरदार बॅटींग केली. ( MCA latest news)

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या बुधवारी निवडणुकीच्या निमित्ताने बैठक झाली. यावेळी स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात नेत्यांनी जोरदार टोलेबाजी केली. यावेळी झालेल्या अराजकीय जुगलबंदी व मिश्किल टोलेबाजीमुळे सभागृहात हास्यांचे फवारे उडाले.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीसाठी शरद पवार,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिग्गज प्रथमच एका मंचावर एकत्र आले. वानखेडे स्टेडिअमवर झालेल्या या स्नेहभोजनाचा कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, भाजपचे आमदार आशिष शेलार, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.

"माझे सासरे शिंदे (सदू शिंदे) होते. फक्त शिंदे नव्हते क्रिकेटर शिंदे होते. महत्त्वाचे म्हणजे शिंदेंची मुलगी पवारांची बायको आहे. त्यामुळे शिंदेंनी आपल्या मुलीची नीट काळजी घेण्यासाठी जावयाच्या ज्या काही सूचना असतील त्यांचा गांभीर्यानं विचार करावा, एवढीच या ठिकाणी विनंती करतो," अशा शब्दात पवारांनी शिंदेंना टोला लगावला.

पवारांच्या या विधानामुळे सभागृहात हास्याचा स्फोट झाला. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनीही पवार यांच्या विधानाला दाद दिली. त्यानंतर फडणवीस यांनी आपल्या भाषणात त्याला उत्तर दिले. फडणवीस म्हणाले,"आता पवार साहेबांनी मुख्यमंत्र्यांवर जी काही जबाबदारी टाकली आहे. त्यात मुख्यमंत्र्यांना असं बांधलं आहे की आता सासरच्या माणसांना कोण टाळू शकतं?"

आज मतदान

या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपचे नेते आशिष शेलार यांच पॅनल एकत्र निवडणूक लढवणार आहे. शरद पवार आणि आशिष शेलार पॅनलचे अमोल काळेविरुद्ध माजी कसोटीवीर संदिप पाटील यांचाशी थेट लढत होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर आणि शिवसेना वाहतूक संघटनेचे निलेश भोसले हेही पवार- शेलार पॅनलकडून कार्यकारिणीसाठी निवडणुकीच्या रिंगणार आहेत. आज दुपारी 3 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com