पवारांनी यादीच वाचून दाखवली; शिंदेंच्या बालेकिल्ल्यातून केंद्र सरकारवर निशाणा

शरद पवार (Sharad Pawar) यांनी ठाण्यात पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama

Sharad Pawar : ठाणे : केंद्र सरकारने (Central Government) दिलेली आश्वासने पाळली नाहीत. 2022 पर्यंत मोदी सरकारने अनेक योजना पूर्ण करणार असल्याचे सांगितले होते. मात्र, त्या पैकी ५० टक्के कामेही पूर्ण केली नाहीत, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोदी सरकारवर केला.

शरद पवार आज ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी भाजपवर (BJP) चौफोर टीका केली. ईडी, सीबीआयची कारवाई, आमदारांची फोडाफोडी व गुजरातमध्ये आरोपींचा झालेला सत्कार अशा अनेक विषयावरुन त्यांनी केंद्र सरकारला लक्ष केले.

Sharad Pawar
मोठी बातमी : राज ठाकरेंनी घेतली फडणवीसांची भेट ; तासभर खलबतं ?

यावेळी पवार यांनी मोदी सरकारच्या योजनांची यादीच वाचून दाखवली. पवार म्हणाले, 2022 पर्यंत सर्वांना शौचालय मिळेल असे केंद्र सरकारने सांगितले होते. मात्र, ते काम 50 टक्केही पूर्ण झाले नाही. त्याच बरोबर 2022 पर्यंत प्रत्येक नागरिकाला घर मिळेल अशी घोषणा पंतप्रधानांनी केली होती. मात्र, सरकारने दिलेल्या आकडेवाडीनुसार प्रत्येका घर मिळाले नाही. फक्त 58 लाख घरे देशभरात बांधण्यात आली आहेत. देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत 30 टक्के सुद्धा घरे मिळालेली नाही.

प्रत्येक घरात जल अशी घोषणा केंद्र सरकारने केली होती. मात्र, त्याचेही काम अपूर्णच आहे. आता ही योजना 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. प्रत्येक भारतीय नागरीकाला 24 तास वीज मिळेल. मात्र, 66 टक्के लोकांनाच विज मिळाली आहे. महिला आत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणत घडत आहे. बिलकिस बानो यांच्या प्रकरणातील गुन्हेगारांची सुटका केली. त्यावरुन पवार यांनी गुजरात सरकारवर निशाणा साधला. गुजरातच्या भाजप सरकारने त्या आरोपींना सोडले. त्या आरोपींचा जाहीर सत्कार करण्यात आला. पंतप्रधानांनी स्वातंत्र्य दिनाचे भाषण मी काळजीपूर्व पाहिले. त्यामध्ये त्यांनी स्त्रियांच्या सन्मानाची भूमिका मांडली. ती भूमिका गुजरातमधील एका निर्णयामुळे दिसते, असा टोलाही त्यांनी लगावला.

Sharad Pawar
शिंदे गटातील आमदार म्हणतात, 'आमचं चुकलं' : चंद्रकांत खैरेंचा दावा

कोणाच्या विरोधात ईडी, सीबीआय लावता येईल का याकडेच केंद्र सरकारचे लक्ष्य आहे. विरोधी पक्षांची सत्ता पाडण्याचे काम सध्या सुरु आहेत. कर्नाटक, तसेच महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचे सरकार पाडण्यात आले. मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांचे सरकार पाडले गेले. अनेक राज्यामध्ये विरोधी पक्षांची सरकारे आहेत. गुजरात, आसाम ही मोजकीच राज्य सोडली, तर भाजपकडे राज्य नव्हती. माणसे फोडणे आणि सरकार स्थापन करणे, ईडीचा वापर करणे असे उद्योग सध्या सुरु आहेत, असा निशाणा पवार यांनी साधला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in