शरद पवार राष्ट्रपतींच्या खूर्चीत विराजमान झाले तर मला आनंद होईल!

विरोधीपक्षात शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी देण्याची सकारात्मक चर्चा सुरु आहे.
Sharad Pawar News, Chagan Bhujbal News, NCP News
Sharad Pawar News, Chagan Bhujbal News, NCP News

मुंबई : राज्यसभेची निवडणूक संपताच आता राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचे सर्वांना वेध लागले आहे. या निवडणुकीसाठी सत्ताधारी तसेच विरोधकांनी तयारी सुरु केली आहे. राष्ट्रपती पदाच्या (President Election) निवडणुकीसाठी शरद पवार (Sharad Pawar) यांचे नाव समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, अन्नपुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Chagan Bhujbal latest news)

छगन भूजबळ म्हणाले, "विरोधीपक्षात शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी देण्याची सकारात्मक चर्चा सुरु आहे. त्यांना उमेदवारी मिळाली अन् ते राष्ट्रपतींच्या खूर्चीत विराजमान झाले तर मला आनंद होईल," (Sharad Pawar News)

Sharad Pawar News, Chagan Bhujbal News, NCP News
संजय राऊत थोडक्यात वाचले, अन्यथा..

राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीसाठी विरोधकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, "राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी शरद पवार यांचे नाव समोर येत असेल तर आमचा त्यांना पाठिंबा राहील," पटोले काल पत्रकारांशी बोलत होते.

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकासाठी शरद पवार हे संयुक्त पुरोगामी आघाडी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार असावेत का? असा प्रश्न नाना पटोले यांना विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना “महाराष्ट्राचा व्यक्ती देशाचा राष्ट्रपती होत असेल आणि शरद पवार यांचे नाव पुढे आले तर महाराष्ट्र काँग्रेस त्यांच्याबोरबर आहे,” असे पटोले यांनी सांगितले.

Sharad Pawar News, Chagan Bhujbal News, NCP News
rajya sabha : मत बाद ठरविल्याने शिवसेनेचे सुहास कांदे उच्च न्यायालयात जाणार

राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीसाठी विरोधकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. येत्या १५ जून रोजी विरोधकांची दिल्ली येथे बैठक होणार आहे. या बैठकीसाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी बिगर भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री तसेच २२ विरोधी पक्षाच्या नेत्यांना बैठकीसाठी आमंत्रित केलं आहे. या बैठकीत निवडणुकीसाठीच्या आगामी रणनीतीवर चर्चा करण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीसाठी विरोधकांकडून कोण उमेदवार असेल यावरदेखील या निवडणुकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २९ जून आहे. ३० जूनपर्यंत अर्जाची छाननी होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २ जुलै आहे. १८ जुलै रोजी मतदान होणार असून २१ जुलै रोजी निकाल जाहीर होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com