Sharad Pawar News : पवारांनी निर्णयावर विचार करायला मागितला दोन-तीन दिवसांचा वेळ : अजित पवारांची माहिती

Sharad Pawar Retirement : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन पदावरुन पायउतार होणार असल्याची घोषणा शरद पवार यांनी केली आहे.
Sharad Pawar
Sharad Pawar Sarkarnama

Sharad Pawar Retirement News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज आपण लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन पदावरुन पायउतार होणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या निर्णयाला विरोध करत निर्णय मागे घेण्याची विनंती केली आहे. यानंतर कार्यकर्त्यांनी वाय. बी. चव्हाण सेंटरच्या बाहेर तळ ठोकला होता. यानंतर अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना शरद पवार यांचा निरोप सांगितला.

कार्यकर्ते वाय. बी. सेंटरच्या पुढे तळ ठोकून बसले होते. जो पर्यंत शरद पवार निर्णय मागे घेणार नाहीत. तो पर्यंत आपण येथून उठणार नाही, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली होती. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सिल्व्हर ओकवर जाऊन पवार यांची भेट घेतली. यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रफुल्ल पेटल, अजित पवार, रोहित पवार, विद्या चव्हाण, चेतन तुपे, अशोक पवार, शेकर निकम हे उपस्थित होते.

Sharad Pawar
Sharad Pawar News : राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुप्रिया सुळे होऊ शकतात; शरद पवारांचे निकटवर्तीय विठ्ठलशेठ मणियार यांचे सूचक वक्तव्य

या नेत्यांनी शरद पवार यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर पवार यांनी कार्यकर्त्यांना संदेश दिला. पवार यांचा हा संदेश अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना सांगितला. त्यामध्ये पवार म्हणाले, माझा निर्णय मी दिलेला आहे. मात्र, मला विचार करायला दोन ते तीन दिवस लागतील, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे दोन ते तीन दिवसांमध्ये शरद पवार काय निर्णय घेताहेत हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

कार्यकर्त्यांनी आता तरी ऐकलं पाहिजे. आता तरी साहेबांचे ऐका. कार्यकर्त्यांनी हट्टीपणा सोडला पाहिजे. माझी सगळ्यांना विनंती आहे. मी साहेबांचा सांगावा घेऊन आलो आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद द्या. दोन ते तीन दिवस विचार विनिमय करायला द्या, असे अजित पवार म्हणाले.

Sharad Pawar
Ajit Pawar News : राजीनामा सत्र थांबवा, कुणाचेही मंजूर होणार नाहीत; अजित पवारांनी केले स्पष्ट !

दरम्यान, शरद पवार यांच्या निर्णयानंतर अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदांचा राजीनामा दिला होता. त्यावरही अजित पवार म्हणाले, कोणत्याही कार्यकर्त्यांने राजीनामा देऊ नये. ज्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यांचे राजीनामे मंजूर करण्यात येणार नाहीत. त्यामुळे कुणीही राजीनामे देऊ नयेत, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com