राज्यसभेबाबत मुख्यमंत्री ठाकरे अन् शरद पवारांचं आधीच ठरलंय! अजितदादांनी स्पष्टचं सांगितलं

राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून राज्यातील राजकारण तापलं आहे.
CM Uddhav Thackeray, NCP Chief Sharad Pawar
CM Uddhav Thackeray, NCP Chief Sharad PawarSarkarnama

मुंबई : राज्यात जूनमध्ये राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होणार आहे. पाच जागांबाबत कुणाचंही दुमत नसलं तरी सहाव्या जागेवरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje) यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केलं आहे. तर शिवसेनेनेही या जागेवर आपला हक्क सांगितला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरूवारी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. (Rajya sabha election 2022 election update)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, राज्य सभेच्या दोन जागा भाजपला, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीला एक जागा मिळेल. त्यानंतर सर्वाधिक मतं शिवसेनेकडे त्यानंतर भाजप, राष्ट्रवादीकडे शिल्लक राहतात. (NCP Ajit Pawar Latest Marathi News)

CM Uddhav Thackeray, NCP Chief Sharad Pawar
राजकीय घडामोडींना वेग; संभाजीराजेंचं खुलं पत्र अन् उद्धव ठाकरेंचं अपक्ष आमदारांना बोलावणं

मागच्यावेळी निवडणुकीत एक जागा असूनही पवारांच्या शब्दाखातर शिवसेनेचा शिल्लक कोटा आम्हाला दिला. त्यामुळे आमच्या दोन जागा गेल्या. त्यावेळी पवारसाहेबांनी कबुल केलं होतं की, दोन वर्षांनी कोटा तुम्हाला दिला जाईल. ही चर्चा दोन वर्षांपूर्वीच झाली आहे. याबाबत पवारसाहेब आणि मुख्यमंत्र्यांची बैठक झाल्याचे आमच्या कानावर आले आहे, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

तिसरी जागा निवडून आणण्यासाठी भाजपकडून घोडेबाजार केला जाऊ शकतो, असा आरोप खासदार संजय राऊत यांनीही केला आहे. तसेच महाविकास आघाडीतील मतं फुटू शकतात, अशीही चर्चा आहे. त्यावर पवार म्हणाले, राज्यसभेच्या निवडणुकीत गुप्त मतदान होत नाही. त्यामुळे फुटाफुट होत नाही. बादही होत नाही. आणि माझ्या अनुभवनानुसार छोटे पक्ष सत्ताधारी पक्षांचे ऐकतात.

CM Uddhav Thackeray, NCP Chief Sharad Pawar
राज ठाकरेंची पाठ फिरताच मनसेत राडा; पुण्यात पदाधिकाऱ्यांमधील वाद चव्हाट्यावर

दरम्यान, संभाजीराजे यांनी महाराष्ट्रातील सर्व विधानसभा आमदारांना (MLA) खुले पत्र लिहिले आहे. पण अद्याप कोणत्याही पक्षानं त्यांना पाठिंबा जाहीर केलेला नाही. तर दुसरीकडे सहाव्या जागेसाठी शिवसेनेने संभाजीराजे यांना पक्षात येण्याची अट घातल्याची चर्चा आहे.

सहाव्या जागेसाठी प्रत्येक मत महत्वाचं असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता वर्षा निवासस्थानी सर्व अपक्ष आमदारांची बैठक बोलावली असल्याचे समजते. यामध्ये ठाकरेंकडून राज्यसभेसाठी या आमदारांना गळ घातली जाऊ शकते. त्यामुळे सहाव्या जागेसाठी चुरस वाढली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com