अरविंद सावंत अन् नवनीत राणांसारख्या निर्लज्ज राजकारण्यांचा धिक्कार; मनसेची टीका

MNS : स्वतःची शून्य कामगिरी पण कार्यकर्त्यांसमोर चमकोगिरी...
Navneet Rana, Arvind Sawant Latest News
Navneet Rana, Arvind Sawant Latest NewsSarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेसोबत बंड केल्यापासून शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गटामध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु आहे.आता याचं रुपांतर मारामारीत झालं आहे. दादरमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी प्रभादेवी येथे शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर समर्थक आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे कार्यकर्ते समोरासमोर आले आणि राडा झाला. यावेळी पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्याने हा संघर्ष टळला. मात्र या वादाचे पडसाद पुन्हा उमटले.

याप्रकरणी शिवसेना खासदार अरविंद सावंत व एका पोलिसामध्ये बाचाबाची झाल्याचे बोलले जाते. नेमक पोलिसांसोबत झालेल्या वादाच्या घटनांवरून मनसेकडून खासदार अरविंद सावंत आणि खासदार नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला आहे. स्वतःची शून्य कामगिरी पण कार्यकर्त्यांसमोर चमकोगिरी करणाऱ्या आणि अशा निर्लज्ज राजकारण्यांचा धिक्कार,अशा शब्दात मनसे (MNS) नेते अमेय खोपकर यांनी टीका केली आहे. (Navneet Rana, Arvind Sawant Latest News)

Navneet Rana, Arvind Sawant Latest News
माझ्याकडे बंदूक आहे पण मी गोळीबार केला नाही...

अमेय खोपकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून पोलिसांची बाजू घेत लोकप्रतिनिधींकडून घातल्या जाणाऱ्या वादावर टीका केली आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, स्वतःची शून्य कामगिरी , पण कार्यकर्त्यांसमोर चमकोगिरी सणासुदीच्या या काळात कुठेही गैरप्रकार होऊ नयेत यासाठी सतत दक्ष असणारे, पावसापाण्यात उन्हातान्हात उभं राहून बाप्पाचा सण निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी राबणारे पोलिस. पण काही राजकारण्यांमध्ये नसते धमक, मग ते कार्यकर्त्यांसमोर या पोलिसांना दमबाजी करतात. विसर्जन मिरवणुकीनंतर दमलेल्या या पोलिसांबरोबर हुज्जत घालायला, त्यांना धमकावयला अरविंद सावंतसारख्या बेशरम खासदाराला सगळ्यात आधी तुरुंगात डांबलं पाहिजे. पोलिसांचा असा अपमान आम्ही कधीच सहन करु शकत नाही. अरविंद सावंत, नवनीत राणा सारख्यांना आम्ही कधीच जबाबदार राजकारणी म्हणूच शकत नाही. अशा निर्लज्ज राजकारण्यांचा धिक्कार असो, अशा शब्दात खोपकर यांनी खासदार सावंत आणि खासदार नवनीत राणा यांच्यावर टीका केली आहे.

Navneet Rana, Arvind Sawant Latest News
महादेव जानकर करणार भाजपची गोची; बारामती स्वबळावर लढण्याची घोषणा!

दरम्यान दादरमध्ये झालेल्या राड्यानंतर खासदार अरविंद सावंत दादर पोलीस स्थानकात दाखल झाले होते तेव्हा सावंत आणि तेथील एका पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचं बोललं जात आहे. तसेच दोन दिवसांपूर्वी खासदार नवनीत राणा यांनीही पोलीस स्थानकात जात पोलिसांशी वाद घातला होता. यावर पोलिस पत्नीकडून संताप व्यक्त करण्यात आला होता आणि नवनीत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली होती. त्यानंतर सावंतांनीही पोलिसांसोबत वाद झाल्यावर मनसेकडून टीका करण्यात आली आहे. यावर आता शिवसेना आणि राणा यांच्याकडून काय प्रत्युत्तर देण्यात येणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, प्रभादेवीत मध्यरात्रीच्या सुमारास शिवसेना आणि शिंदे गटात राडा झाला होता. याबाबत दादर पोलिसांनी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर शिंदे गटाच्या संतोष तेलवणे यांना शिवसैनिकांनी मारहाण केल्याच्या आरोपाखाली. पाच शिवसैनिकांना अटक करण्यात आली होती. मात्र आज त्यांना जामीन मिळाला असून त्यांना सोडण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in