शंभुराज देसाईंचा मोठा दावा : राष्ट्रवादीचे आमदार संध्याकाळी आमच्याकडे..

Shambhuraj Desai : मुख्यमंत्र्यांकडे विषय येतो. मग आम्ही विचारतो, पण काय आमच्याकडे येण्याचा विचार?
Shambhuraj Desai, Ajit Pawar
Shambhuraj Desai, Ajit Pawarsarkarnama

मुंबई : शिंदे गटाचे नेते व राज्याचे मंत्री शंभुराज देसाई यांनी मोठा खळबळजनक दावा केला आहे. राष्ट्रवादीचे काँग्रेसचे काही आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा देसाई यांनी केला आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे. यामुळे आता राष्ट्रवादीतून शिंदे गटात इनकमिंग होणार का? याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकार पडणार असल्याचे बोलेले होते. यावर शंभुराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिले आहे. देसाई म्हणाले, जे आमदार दादांबरोबर आहेत, पण आमच्याकडे संध्याकाळी कोण येतं, कोणकोण आमच्याकडे काम घेऊन येतो. तेवढं जरा मुख्यमंत्र्यांकडे विषय घेत चला. मग आम्ही विचारतो, सगळं करू, पण काय आमच्याकडे येण्याचा विचार? वगैरे अशा गोष्टी होतात. मग या गोष्टी थांबवण्यासाठी सरकार पडतंय, असं अजित पवारांकडून बोललं जातंय, असे देसाई म्हणाले.

Shambhuraj Desai, Ajit Pawar
मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्र्यांमध्ये काहीतरी बिनसल्याची जोरदार चर्चा!

देसाईंच्या या दाव्यानंतर आता शिंदे गटात आणखी आमदारांची भरती होईल, अशा शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गटात वाद पेटण्याची शक्यता आहे. मात्र अजूनही राष्ट्रवादीकडून यावर प्रतिक्रीया आलेली नाही. शिंदे गट आणि राष्ट्रवादी नवा संघर्ष उफाळून येण्याची चिन्हे दिसत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com