Ajit Pawar On Rumour : आता 'अॅफिडेव्हीट'वर लिहून देऊ का? माध्यमांतील चर्चांमुळे अजित पवार उद्विग्न

Ajit Pawar on Media : राज्यातील समस्यांकडे लक्ष देण्याचा माध्यमांना दिला सल्ला
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama

Ajit Pawar Stop the Gossip on BJP Entry : शिवसेनेच्या फुटीनंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होणार आहे. आता विरोधी पक्षनेते अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल होणार असल्याचा चर्चांना उधाण आले होते. त्यामुळे काही दिवसांपासून राज्यातील राजकारणाच्या केंद्रस्थानी अजित पवार होते. त्यांच्या प्रवेशावरून अनेक नेत्यांनी वेगवेगळी विधाने केली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उलटसुलट चर्चा झाल्या. त्यावर अखेर आज अजितदादांनी पडदा टाकला आहे. दरम्यान प्रसारमाध्यमांतील चर्चांवर 'मी कुठेही जाणार नाही, हे तुम्हाला 'अॅफिडेव्हीट'वर लिहून देऊ का', अशी उद्विग्नता पवार यांनी व्यक्त केली.

Ajit Pawar
Ajit Pawar On Rumours: ...तोपर्यंत राष्ट्रवादी सोडणार नाही; अजितदादांकडून भाजप प्रवेशाच्या चर्चांवर पडदा

अजित पवार (Ajit Pawar) भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता असल्याची सत्तेतील आपच्या अंजली दमानिया यांच्याह शिवसेना आणि भाजपमधील काही नेत्यांनी वेळोवेळी वेगवेगळी विधाने केली. दमानिया यांनी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल होणार असे ट्विट केले होते. त्यानंतर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही भाजपचे ऑपरेशन लोटस् २.० सुरू असून त्यांचा डोळा राष्ट्रवादीवर असल्याचे विधान केले.

भाजपचे प्रदेशाध्य चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी अजित पवारांच्या स्वागताची तयारी केली होती. दरम्यान नागपूरच्या महाविकास आघाडीच्या सभेत अजित पवार बोलले नाहीत, त्यावरूनही शिवसेनेतील (शिंदे गट) नेत्यांनी अजितदादा नाराज असल्याची चर्चा केली. परिणामी माध्यमांतही उलटसुलट चर्चांना सुरूवात झाली. त्यामुळे अजित पवारांनी आज प्रसारमाध्यमांवरही जाहीरपणे नाराजी व्यक्त केली.

Ajit Pawar
Ajit Pawar On Sanjay Raut : तुमच्या पक्षाचं बघा; आमच्याबद्दल का बोलता? अजितदादांनी राऊतांना सुनावलं !

अजित पवार म्हणाले, "इतर पक्षाचे नेते काय म्हणातात हा त्यांचा अधिकार आहे. आमच्या पक्षातील कुणी काही बोलले नसताना माझ्याबद्दल ज्या चर्चा सुरू आहेत त्यात काहीच तथ्य नाही. मला जो काही निर्णय घ्यायचा झाला तर तो मी जाहीरपणे प्रसारमाध्यमांना सांगेन. मात्र 'देवगिरी'बाहेर विनाकारण कॅमेरे लावून बसण्यात काही अर्थ नाही. यामुळे राष्ट्रवादीच्या (NCP) कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होत आहे. मी व माझे सहकारी बदनाम होत आहेत. मी जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहणार आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वात काम करणार आहे. आता हे 'अॅफेडिव्हीट'वर लिहून देऊन का? तुम्हीही सभ्यता पाळा!"

Ajit Pawar
Supriya Sule News : 'काहीही झालं तरी बिचाऱ्या दादांवरच खापर फुटतं' ; सुप्रिया सुळेंची उद्विग्न प्रतिक्रिया !

सध्या राज्यात (Maharashtra) अनेक गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत. सरकारला एकही आश्वासन पूर्ण करता आलेले नाही. त्यामुळे समस्यांचे मुद्द्यांवरून भरकटविण्याचे काम सध्या सुरू असल्याचा आरोपही पवार यांनी यावेळी केली.

अजित पवार म्हणाले, "आता राज्यातील महत्त्वाचे प्रश्नाकंडे दुर्लक्ष केले जात आहे. महागाई, ७५ हजारांची नोकर भरती, बेरोजगार, शेतकऱ्याचे प्रश्न प्रलंबित आहेत. अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी दौरा केला त्यानंतर तातडीची मदत होणे अपेक्षित होते, मात्र तसे झाले नाही. प्रसारमाध्यमांनी या समस्यांकडे लक्ष द्या. मी कुठेही जाणार नाही, त्यामुळे कुणीही काही काळजी करण्याचे गरज नाही."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com