आता धनुष्यबाण डोहाळे जेवणासाठी भाड्याने देण्याची वेळ..; शालिनी ठाकरेंची जहरी टीका

Shalini Thackeray| Uddhav Thackeray| Shivsena लोकसभेत अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता मिळविल्यावर एकनाथ शिंदे यांनी आता शिवसेनेवरच दावा ठोकला आहे.
Shalini Thackeray| Uddhav Thackeray| Shivsena
Shalini Thackeray| Uddhav Thackeray| Shivsena

मुंंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट आणि शिवसेनेतील (Shivsena) संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. एकीकडे न्यायालयीन लढाई आणि दूसरीकडे दिवसेंदिवस शिंदे गटाला वाढता पाठिंबा पाहता शिवसेनेसाठी (Shivsena) आता ही लढाई अटीतटीची झाली आहे. निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची ओळख असलेला धनुष्यबाण कोणाला मिळणार यावर चर्चांना उधाण आलं आहे. यावर माझ्या भात्यातील कितीही बाण पळवले तरी धनुष्यबाण माझ्याकडे राहणार असल्याचं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी केलं होतं.

तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनीदेखील शिवसेनेचं पक्ष चिन्ह असलेल्या धनुष्यबाणासाठी राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे. त्यानतंर आता मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधाला आहे. “रेल्वे इंजिन भाड्याने द्या म्हणून उपदेश देणार्‍यांवर धनुष्यबाण डोहाळे जेवणासाठी भाड्याने देण्याची वेळ आली आहे,” असं म्हणत शालिनी ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर जहरी टीका केली आहे. शालिनी ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांना हा टोला लगावला आहे.

Shalini Thackeray| Uddhav Thackeray| Shivsena
आता पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कामाची सुरुवात होणार राष्ट्रगीताने...

महाराष्ट्राच्या राजकारणात 'आवाज कोणाचा' अशी डरकाळी वर्षानुवर्षे फोडणाऱ्या शिवसेनेवर (Shivsena) आता 'पक्ष कोणाचा' हा घटनात्मक पेच निर्माण झाला आहे. लोकसभेत अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता मिळविल्यावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आता शिवसेनेवरच दावा ठोकला आहे. शिंदे गटाच्या खासदारांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून, आपल्याच गटाला 'शिवसेना' म्हणून मान्यता द्यावी, अशी विनंती केली आहे.

शिवसेनेवरील वर्चस्वाचा मुद्दा आता आयोगाच्या दारात पोहोचल्याने सन १९६६ मध्ये शिवसेनेच्या स्थापनेपासूनच या पक्षाची अविभाज्य ओळख बनलेले दनुष्य बाण हे चिन्ह पक्षप्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे रहाणार का, याकडे लक्ष लागले आहे. पक्षाचे नाव व निवडणूक चिन्ह आपल्याकडेच रहावे यासाठी ठाकरे गटाने यापूर्वीच आयोगाककडे धाव घेतली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in