आर्यनचा जामीन फेटाळताच शाहरुखनं गाठलं तुरुंग

आर्यन मागील तेरा दिवसांपासून तुरूंगात आहे.
Shahrukh & Gauri Khan, Aryan Khan
Shahrukh & Gauri Khan, Aryan Khan

मुंबई : कार्डिलिया क्रूझवर ड्रग्ज पार्टी (Cruise Drugs case) प्रकरणी अटकेत असलेल्या आर्यन खानसह (Aryan Khan) इतर दोन आरोपींचा जामीन विशेष NDPS न्यायालयाने बुधवारी फेटाळला. आर्यनच्यावतीने लगेचच उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली आहे. त्यावर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. पण त्याआधीच मुलाला भेटण्यासाठी अभिनेता शाहरूख खान (Shahrukh Khan) गुरूवारी सकाळी ऑर्थर रोड कारागृहात पोहचला.

मागील तेरा दिवसांपासून तुरूंगात असलेल्या आर्यनचा तेथील मुक्काम वाढला आहे. आता तुरूंगातून सुटण्यासाठी त्याच्याकडे एकच पर्याय उरला आहे. एनडीपीएस न्यायालयाच्या निकालानंतर आर्यनसह इतर आरोपींच्या वकिलांनीही उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. येत्या 30 तारखेपासून न्यायालयाला दिवाळीची सुट्टी आहे. त्याआधीच आर्यनला जामीन मिळण्यासाठी आर्यनमार्फत उच्च न्यायालयात अर्ज करण्यात आला आहे. त्यासाठी वकिलांनी तयारी सुरू केली असून उच्च न्यायालयात अर्ज करण्यात आला आहे.

Shahrukh & Gauri Khan, Aryan Khan
एनसीबीची 90 टक्के प्रकरणं खोटी, वकील पुरावे गोळा करतायेत! नवाब मलिकांचा बॉम्ब

आर्यनच्यावतीने ज्येष्ठ वकिल अमित देसाई यांच्याकडून या प्रकरणावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली जाणार आहे. त्याआधीच शाहरुख खान गुरूवारी सकाळी कारागृहात आर्यनच्या भेटीसाठी पोहचला. तब्बल तीन आठवड्यानंतर आर्यन व शाहरूख खानची भेट झाली. दोघांना भेटण्यासाठी आज परवानगी मिळाली असल्याने ही भेटी होऊ शकली आहे. उच्च न्यायालयात आज यावर काय निर्णय होतोय, यावर सर्वांचं लक्ष लागलं आहे. यावरच आता आर्यनची कुटुंबीयांशी भेट कधी होणार, हे ठरणार आहे.

दरम्यान, आर्यन मागील तेरा दिवसांपासून तुरूंगात आहे. आर्यन खानच्या वतीनं ज्येष्ठ वकिल अमित देसाई व सतीश मानेशिंदे यांनी काही दिवसांपूर्वी बाजू मांडली होती. तर NCB कडून ASG अनिल सिंह यानी बाजु मांडली होती. या प्रकरणात आर्यनला दिलासा मिळणार की नाही, याबाबत उत्सुकता होती. पण एनसीबीने आर्यनच्या व्हॉट्स अॅप चॅटची माहिती न्यायालयात सादर केली होती. तसेच काही जुन्या डॅग्ज प्रकरणांचा संदर्भही न्यायालयाने दिला होता. त्यावरील निकाल न्यायालयाने राखून ठेवला होता.

Shahrukh & Gauri Khan, Aryan Khan
आर्यनखानचा जामीन फेटाळल्यानंतर समीर वानखेडे दोनच शब्द बोलले... ते शब्द होते..

आर्यनचा जामीन फेटाळण्यामागे व्हॉट्स अॅप चॅट आणि त्याच्यासोबतच्या इतर जणांकडे डॅग्ज सापडणे हे आर्यनला भोवल्याचे दिसते. बुधवारी न्यायालयाने याच मुद्यांच्या आधारे आर्यनचा जामीन फेटाळला आहे. बॉलिवूड अभिनेता शाहरुखचा 23 वर्षीय मुलगा आर्यन खान याला एनसीबीने 2 ऑक्टोबर रोजी मुंबई किनाऱ्यावरील कॉर्डेलिया क्रूझ जहाजावर रेव्ह पार्टी छाप्यादरम्यान अटक केली होती. यानंतर 7 ऑक्टोबर रोजी न्यायालयाने आर्यनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. सध्या तो मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये आहे. आर्यन खानसोबत एनसीबीने आणखी सात जणांनाही अटक केली होती. या प्रकरणात परदेशी नागरिक आणि कथित अमली पदार्थ तस्करांसह एकूण वीस जणांना अटक करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com