शहाजी बापू स्वत:च वैतागले म्हणाले,'कशाला ती स्टाइल, कटाळा आलाय, बस्स झालं आता...

Shahaji Bapu Patil| शहाजी बापू जिथं जिथं जातात तिथं आता त्यांच्या या व्हायरल डायलॉगची मागणी केली जाते.
 Shahaji Bapu Patil|
Shahaji Bapu Patil|

मुंबई : आज राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणुकीचं मतदान प्रक्रिया पार पडत आहे. त्यासाठी प्रत्येक राज्यातील राज्याच्या विधानसभेत सर्व आमदार आपापल्या मतदानाचा हक्क बजावत आहेत. अशात आज बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील यांनीही मतदानाचा हक्क बजावला. बंडखोरीनंतर शहाजी बापू पाटलांचा एक ऑडियो चांगलाच व्हायरल झाला होता. 'काय झाडी, काय डोंगर, काय हाटील...एकदम ओक्के!', हा शहाजी बापू यांचा संवाद इतका लोकप्रिय झाला की यावर सोशल मीडियावर अनेक मिम्सही बनवण्यात आले. इतकंच नाही तर या डायलॉगवर गाणीही आली. (Shahaji Bapu Patil latest news update)

शिंदे फडणवीसांच्या सत्तास्थापनेनंतर शहाजी बापू जिथं जिथं जातात तिथं आता त्यांच्या या व्हायरल डायलॉगची मागणी केली जाते. सुरुवातीला सर्वांच्या आग्रहाखातर शहाजी बापूंनी अनेकदा त्यांच्या स्टाइलमध्ये प्रतिक्रियाही दिल्या. पण आता तेच तेच बोलून खुद्द शहाजी बापूच याला कंटाळले आहेत. तसं त्यांनी आज थेट बोलूनही दाखवलं.

 Shahaji Bapu Patil|
शिवसेनेला आणखी एक हादरा; रामदास कदम यांचा 'जय महाराष्ट्र'

राष्ट्रपतींच्या पदाच्या मतदन प्रक्रियेनंतर, देशाच्या नव्या राष्ट्रपतींचं अभिनंदन तुम्ही तुमच्या स्टाइलमध्ये कसं कराल, असा सवाल प्रसार माध्यमांनी त्यांना विचारला असता, शहाजी बापू म्हणाले की, नव्या राष्ट्रपतींना मी आता नाही २२ तारखेला शुभेच्छा देईन. मी माझ्या स्टाइलमध्ये नव्या राष्ट्रपतींना शुभेच्छा देईन आणि आता कशाला ती स्टाइल. बंद करूया. कटाळा आलाय. महाराष्ट्रातील माणसं पण आता कटाळतील. याचं आता दररोज कुठं ऐकायचं म्हणतील", असं शहाजी बापू पाटील यांनी हसत हसतच उत्तर दिलं.

दरम्यान, राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीच्या एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना महाराष्ट्रातून २०० मतं मिळतील, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता.यावरही शहाजी बापूंनी भाष्य केलं. "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या राजकीय डावपेचावर विश्वास आहे. ज्यापद्धतीनं त्यांनी आखणी केली ते पाहता त्यापद्धतीनं २०० किंवा त्यापेक्षा अधिक मतं द्रौपदी मुर्मू यांना पडतील, ते २०० चा आकडा पार करतील, असा विश्वास शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in