
उल्हासनगर : उल्हासनगर (Ulhasnagar) मध्यवर्ती पोलिसांनी एका घरात टाकलेल्या छाप्यात जुगार खेळणाऱ्या सात महिलांना पकडले. आत्तापर्यंत अशा कारवाईत जुगार खेळताना पुरुष आढळत होते पण या कारवाईत चक्क महिला जुगार खेळत असल्याचे सापडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
सर्वसाधारणपणे जुगार केवळ पुरूषच खेळतात असा समज आहे. परंतु चक्क महिला जुगार खेळताना उल्हासनगर मध्यवर्ती पोलिसांनी कारवाई केली आहे. एका घरात टाकलेल्या छाप्यात महिला जुगार खेळत असल्याचे समोर आले आहे. या कारवाईत सात महिलांना जुगार खेळताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
मध्यवर्ती पोलिस ठाण्याच्या हद्दीत २० सेक्शन परिसरात एका घरात हा तीन पत्ती जुगार खेळविला जात होता. याची माहिती मध्यवर्ती पोलिसांना मिळाली होती त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून सात महिलांना अटक करण्यात आली. जुगारात लावलेले पैसेही पोलिसांनी जप्त केले आहे. आता याप्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश बंडगर करीत आहेत.
पिंपरी चिंचवडमध्ये १४ पिस्तूल आणि आठ जिवंत काडतूसे जप्त
पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) सांगवी आणि चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीत गोळीबार करून दोन खळबळजनक खुनाच्या घटना नुकत्याच घडल्याने शहर पोलिस सतर्क झाले होते. त्यातून त्यांनी बेकायदेशीर अग्निशस्त्रांच्या तस्करीचा माग घेण्यास सुरवात केली अन त्यांच्या हातात घबाड सापडले. तब्बल १४ अवैध पिस्तूले (pistols) व आठ जिवंत काडतूसे असा मोठा शस्त्रसाठा त्यांच्या हाती आला. त्यामुळे शहरात होणारे आणखी काही खून तथा मोठे अनुचित प्रकार टाळल्याचा दावा पोलिसांनी मंगळवारी (ता. १८ जानेवारी) केला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.