नितेश राणे म्हणाले, ओवेसींना औरंगजेबाकडे पाठण्यासाठी १० मिनिटे पोलिसांना बाजूला करा

Nitesh Rane On Akbruddin Owaisi ज्यांना घरातून हाकलून दिले त्यांच्याबद्दल काय बोलायचे, अशी टीका आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी केली होती.
Nitesh Rane |  Akbruddin Owaisi
Nitesh Rane | Akbruddin Owaisi

Nitesh Rane On Akbruddin Owaisi

मुंबई : ज्यांना घरातून हाकलून दिले आहे, त्यांच्याबद्दल काय बोलणार ? तेवढी त्यांची लायकी देखील नाही. मुस्लिम समाज कोणाच्याही भुलथांपाना बळी पडणार नाही, आम्ही कुणाला घाबरणारे नाहीत, योग्यवेळी त्यांना उत्तर देण्यासाठी खंबीर आहोत, असा इशारा एमआयएमचे नेते आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी यावेळी दिला. गुरुवारी (१२ मे) औरंगाबाद येथे आयोजित सभेत ते बोलत होते.

या टीकेवर आता भाजप नेते नितेश राणे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. ''मी आव्हान करतो, पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा. याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर. आम्ही शिवरायांचे मावळे नाही!!!'' असे ट्विट करत नितेश राणे अकबरुद्दीन ओवेसींना इशाराच दिला आहे. ''या कारट्या ओवेसी ला माहीत आहे की, मी औरंगजेबाच्या थडग्या समोर नागडा नाचलो तरी मला दोन पायावर महाराष्ट्रात फिरता येईल.. कारण राज्या मध्ये "नामर्दांचे सरकार आहे"… याला म्हणतात यांचे खरे हिंदुत्व!!'' असही नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

Nitesh Rane |  Akbruddin Owaisi
ओवेसी बोकडांनी महाराष्ट्रात येऊन बडबड करू नये; ओवेसींच्या टीकेला मनसेकडून प्रत्युत्तर

याचवेळी मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित करून सरकारला अल्टीमेट देणाऱ्या राज ठाकरेंचाही अकबरुद्दीन यांनी अप्रत्यक्ष समाचार घेतला. मी महाराष्ट्रात कुणाला उत्तर द्यायला आलेलो नाही, तेवढी त्यांची लायकी देखील नाही. ज्यांना घरातून हाकलून दिले त्यांच्याबद्दल काय बोलायचे ? कुणी कितीही भडकावण्याचा प्रयत्न केला तरी मुस्लिम समाजाने त्याला बळी पडू नये. आम्ही योग्य वेळी अशा लोकांना उत्तर द्यायला खंबीर आहोत, असा इशाराही अकबरुद्दीन यांनी आपल्या भाषणात दिला. हा देश आमचा आहे, इथे सगळे सुखाने, गुण्यागोविंदाने राहू आणि देशाला पुढे नेऊ, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

तर 'ओवेसी बोकडांनी महाराष्ट्रात येऊन बडबड करू नये, ती औरंगजेबाची औलाद महाराष्ट्रात येऊन इथे बडबड करणार, हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे, कोणाच्या आशिर्वादाने हे सुरु आहे.'' असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com