देशपांडे अन् धुरी प्रकरण पोलिसांवरच शेकलं; न्यायालयानं जोरदार फटकारलं

पोलिसांच्या हाती तुरी देऊन संदीप देशपांडे अन् संतोष धुरी झाले होते पसार
Sandeep Deshpande, Raj Thackeray and Sanotsh Dhuri
Sandeep Deshpande, Raj Thackeray and Sanotsh Dhuri Sarkarnama

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) आणि संतोष धुरी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या दोघांना सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. हे प्रकरण आता पोलिसांवरच शेकल्याचं चित्र आहे. सत्र न्यायालयानं या प्रकरणी पोलिसांनी फटकारत काल्पनिक गुन्हे दाखल केल्याचे ताशेरे ओढले आहेत. यामुळं पोलिसांच्या अडचणीत वाढ झाल्याचं मानलं जात आहे. (MNS Sandeep Deshpande Latest News Updates)

देशपांडे अन् धुरी या दोघांनी पोलिसांना धक्काबुक्की करून शिवतीर्थाबाहेरुन पलायन केले होते. यानंतर दोघेही गायब झाले होते. पोलिसांनी त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल केले होते. त्यांना आता अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. सत्र न्यायालयानं मात्र, या निकालात पोलिसांना चांगलंच फटकारलं आहे. हा गुन्हा कोणत्याही तथ्यांवर आधारित नसून काल्पनिक आहे, असं न्यायालयानं म्हटलं आहे. आरोपींमुळे इतरांच्या जिवाला धोका होता, हा पोलिसांचा दावाही न्यायालयाने निकालात फेटाळला आहे.

Sandeep Deshpande, Raj Thackeray and Sanotsh Dhuri
माजी मुख्यमंत्र्यांना दणका! गेल्याच वर्षी तुरुंगातून सुटल्यानंतर आता पुन्हा शिक्षा होणार

जामीन मिळाल्यानंतर संदीपर देशपांडे जिथून पळाले तिथंच पुन्हा अवतरले होते. त्यांनी जाहीरपणे राज्य सरकारला आव्हान दिलं होतं. शिवतीर्थाबाहेर पत्रकार परिषदेत बोलताना देशपांडे म्हणाले होते की, आम्ही सरकारविरोधी बोलू नये, आमची थोबाडं बंद राहावीत यासाठी आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. माध्यमांनी दाखवलेल्या फुटेजवरून आम्ही कसलाही गुन्हा केला नाही हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे मी तुमचे आभार मानतो. मी जर धक्का लावल्याचं तुम्ही दाखवलं तर मी राजकारण सोडून देईन. शिवसेना आणि राज्य सरकार सुडाचे राजकारण करीत आहेत. मी घरी नसताना माझी मुलं आणि बायको घरी असताना तुम्ही पोलीस पाठवता. हे तुम्हाला पटतं का? आज तुमचे दिवस आहेत, उद्या आमचेही दिवस येतील.

Sandeep Deshpande, Raj Thackeray and Sanotsh Dhuri
संभाजीराजेंचा गेम होणार? भाजपच्या प्रवीण दरेकरांनी दिले वेगळेच संकेत

संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्याविरोधात मुंबईतील शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या शिवतीर्थ निवासस्थानाबाहेरुन पोलीस देशपांडे यांना ताब्यात घेणार होते. त्यावेळी पोलिसांच्या ताब्यातून ते निसटले. पण पळून जाताना पोलिसांशी झालेल्या झटापतीत एक महिला पोलीस कर्मचारी जखमी झाली होती. यावरुन दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र देशपांडे यांनी निर्दोष असल्याचा दावा केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com