ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांच निधन

Pradip Bhide Passes away| चोवीस तास बातम्या देणाऱ्या वाहिन्या येण्यापूर्वी बातम्या देणारे दूरदर्शन हे एकमेव दृकश्राव्य माध्यम होते. त्यावेळी प्रदीप भिडे यांनी वृत्तनिवेदनाच्या क्षेत्रात आपली खास ठसा उमटवला.
ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांच निधन

Pradip Bhide passes away

मुंबई : गेल्या चाळीस वर्षांहून अधिक वर्षे ‘नमस्कार, आजच्या ठळक बातम्या’ असे सांगणारा भारदस्त आवाज आज कायमचा शांत झाला. सह्याद्री वाहिनीवर वृत्तनिवेदक म्हणून काम करणारे ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचे आज (७ जून) निधन झाले. आज संध्याकाळी ६ वाजता अंधेरी पूर्व येथील पारशीवाडा स्मशानभूमीत प्रदीप भिडे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

प्रदीप भिडे यांनी सुरवातीला काही काळ ‘ई-मर्क’ आणि ‘हिंदूस्थान लिव्हर’ या बहुराष्ट्रीय कंपन्यांत ‘जनसंपर्क अधिकारी’ म्हणून नोकरी केली. अलीकडच्या काळातील चोवीस तास बातम्या देणाऱ्या वाहिन्या येण्यापूर्वी बातम्या देणारे दूरदर्शन हे एकमेव दृकश्राव्य माध्यम होते. त्यावेळी प्रदीप भिडे यांनी वृत्तनिवेदनाच्या क्षेत्रात आपली खास ठसा उमटवला. १९७२ मध्ये त्यांनी पहिल्यांदा दूरदर्शनमध्ये प्रवेश केला. त्यानंतर १९७४ पासून त्यांनी वृत्तनिवेदनास सुरुवात केली. तेव्हापासून पुढची अनेक वर्षे त्यांनी दूरदर्शनसाठी वृत्तनिवेदकाचे काम केले. देशातील आणि राज्यभरातील अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडींवेळी प्रदीप भिडे यांनी केलेले वृत्तनिवेदन आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहे.

ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांच निधन
शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराचं काय होणार? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

खार येथे प्रदीप भिडे यांचा प्रियंका स्टुडिओ आहे. प्रदीप भिडे यांनी पाच हजारांहून अधिक जाहिराती, माहितीपट, लघुपटांना ‘आवाज’ दिला. तर आपल्या कारकीर्दित दीड ते दोन हजार कार्यक्रमांचे सूत्रसंचालन/निवेदन केले. ‘पुणे फेस्टिव्हल’च्या पहिल्या वर्षांपासून पुढील सात-आठ वर्षे सूत्रसंचालनाचे कामही प्रदीप भिडे यांनीच केले. त्यावेळी त्यांना ‘पुणे फेस्टिव्हल’चा ‘उत्कृष्ट निवेदक’ हा पुरस्कारही मिळाला.

१९९५ मध्ये शिवसेना-भाजप युतीच्या मंत्रिमंडळाचा शिवाजी पार्कवर झालेला शपथविधी सोहळ्यापासून देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी अशा एक ना अनेक महत्त्वाच्या राजकीय व सांस्कृतिक कार्यक्रमांचे सूत्रसंचालनही प्रदीप भिडे यांनीच केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in