मुर्मू यांना सेनेचा पाठिंबा : महाविकास आघाडी फुटणार?

Balasahe Thorat|Shivsena|Uddhav Thackeray : शिवसेना महविकस आघाडीमध्ये आहे पण आमच्याशी चर्चा केली नाही.
Uddhav Thackeray - Balasaheb Thorat
Uddhav Thackeray - Balasaheb ThoratSarkarnama

Presidential election : शिवसेना (Shivsena) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत NDA च्या उमेदवार द्रोपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती त्यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. मात्र, त्यांच्या या निर्णयानंतर महाविकास आघीडीतील (Mahavikas Aghadi) त्यांचे मित्रपक्ष असलेल्या कॅाग्रेसकडून यावर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

याबाबत काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे मुर्मू यांना शिवसेनेने पाठिंबा दिल्याने महाविकास आघाडीत बिघाडी सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे.

Uddhav Thackeray - Balasaheb Thorat
खासदार हेमंत पाटील ‘या’ कारणामुळे मातोश्रीवर उशिरा पोहोचले...

थोरात म्हणाले की, राष्ट्रपती पदाची निवडणूक ही वैचारिक लढाई आहे. लोकशाही आणि संविधान रक्षणासाठी सुरू असलेला हा संघर्ष आहे. स्त्री, पुरुष किंवा आदिवासी, बिगर आदिवासी अशी ही लढाई नाही. जे संविधान आणि लोकशाहीच्या संरक्षणाच्या बाजूने आहेत ते सर्व यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देत आहेत. शिवसेनेने द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा का दिला? त्यासाठी त्यांनी काही कारणही सांगितले, मात्र त्या पाठीमागील त्यांची खरी भूमिका काय ते शिवसेनेचे नेतृत्वच सांगू शकेल, त्याबद्दल आम्ही काय सांगणार?, असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

Uddhav Thackeray - Balasaheb Thorat
खासदारांची मन की बात उद्धव ठाकरेंनी मानली; मुर्मू यांना पाठिंबा केला जाहीर

शिवसेना हा एक वेगळा राजकीय पक्ष असून त्यामुळे ते त्यांची भूमिका घेऊ शकतात. मात्र या वैचारिक लढाईत जेव्हा गैर लोकशाही मार्गाचा अवलंब करून राज्यातील सरकार पाडले गेले, शिवसेनेच्या अस्तित्वाला आव्हान दिले गेले, अशा परिस्थितीत शिवसेनेने घेतलेली भूमिका अनाकलनीय आहे. शिवसेना महाविकास आघाडीत आहे, पण हा निर्णय घेताना त्यांनी आमच्याशी काहीही चर्चा केलेली नाही, अशी थेट नाराजी थोरात यांनी व्यक्त केली आहे. यामुळे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने आता महाविकास फुटणार की काय?, अशी चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, ठाकरे यांनी आज स्वत: पत्रकार परिषदेत मुर्मू यांना शिवसेनेचा पाठिंबा जाहीर केला होता. ते यावेळी म्हणाले होते की, गेल्या चार ते पाच दिवसांत आदिवासी आणि त्या समाजात काम करणाऱ्या शिवसैनिकांनी विनंती केली आहे. त्यामध्ये एकलव्य संघटनेचे शिवाजीराव ढवळे, अमशा पडवी, निर्मला गावित, पालघरच्या जिल्हा परिषद अध्यक्षा आल्या होत्या. याबरोबरच एसटी-एससी समाजातल्या लोकांनी विनंती केल्याने आणि पहिल्यांदाच आदिवासी समाजातल्या व्यक्तीला राष्ट्रप्रमुख बनण्याची संधी मिळत असल्याने आपण त्यांना हा पाठिंबा दिल्याचे त्यांनी जाहीर केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com