'ईडी'चे बंद गेट पाहून नितीन राऊतांच्या अंगात 'ऊर्जे'चा संचार

राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत ( Nitin Raut ) यांनी तर थेट पोलिसांचा सुरक्षा घेरा तोडत ईडीच्या गेटवर चढले.
Nitin Raut
Nitin RautSarkarnama

मुंबई - सोनियाजी गांधी व राहुलजी गांधी यांना अंमलबजावणी संचालनालयची ( ईडी ) नोटीस पाठवली. त्यामुळे केंद्र सरकारविरोधात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole ), विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) व मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून ईडी कार्यालयावर धडक मोर्चा काढून तीव्र निषेध करण्यात आला. हा मोर्चा ईडीच्या कार्यालयावर जाऊन धडकला त्यावेळी राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत ( Nitin Raut ) यांनी तर थेट पोलिसांचा सुरक्षा घेरा तोडत ईडीच्या गेटवर चढले. तसेच या गेटला जोरजोरात धडका देत ईडी प्रशासनाला आव्हानच दिले. ( Seeing the closed gate of ED, energy flowed in Nitin Raut's body )

आज काँग्रेसचे नेते मोठ्या संख्येत मुंबईत जमले. याता आमदार, राज्यातील विविध ठिकाणचे जिल्हाध्यक्ष यांसह काँग्रेसचे कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जमले. त्यांनी केंद्र सरकार विरोधात घोषणा देण्यास सुरवात केली. त्यांच्या हातात काँग्रेसचे झेंडे होते. हातात केंद्र सरकारच्या विरोधातील फलक होते. खूप झाली दडपशाही देशाला हवी लोकशाही, संविधान विरोधी मोदी सरकारचा धिक्कार असो, आदी फलक होते.

Nitin Raut
Video: विमानतळावरच करा प्रवाशांची चाचणी...; नितीन राऊत

नाना पटोले यांच्या हातात माईक होता. ते कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. उपस्थित कार्यकर्त्यांना मंत्री व नेत्यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर ईडी कार्यालयाच्या दिशेने मोर्चा निघाला. ई़डी कार्यालयाला पोलिसांनी छावणीचे स्वरूप दिले होते मोर्चा पाहताच पोलिसांनी ईडी कार्यालयाचे गेट बंद केले.

Nitin Raut
काँग्रेसचा मोर्चा ईडीवर धडकला : पटोले म्हणाले, हुकुमशाहीला लोकशाही मार्गाने उत्तर देणार

ईडी कार्यालयाचे बंद गेट पाहून राज्याचे मंत्री नितीन राऊत यांच्यात ऊर्जेचा संचार झाला. त्यांनी थेट गेटवर चढत गेटला धडक देण्यास सुरवात केली. राज्याचे मंत्रीच कायदा व सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडवित असल्याचे पाहून पोलिसांनी मंत्र्यांना ताब्यात घेतले. तसेच या मंत्रांना पोलिसांच्या पिंजरा गाडीत टाकत ईडी कार्यालयापासून दूर नेण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com