मोठी बातमी : राज्यातील सर्व शाळांची घंटा एक तारखेला वाजणार

कोरोना संकटामुळे दीड वर्षांहून अधिक काळापासून ऑनलाईन वर्ग सुरू आहेत.
मोठी बातमी : राज्यातील सर्व शाळांची घंटा एक तारखेला वाजणार
SchoolSarkarnama

मुंबई : कोरोना (Corona) संकटामुळे मागील दीड वर्षांहून अधिक काळापासून बंद असलेल्या राज्यातील शाळा (Schools) पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. येत्या एक डिसेंबरपासून राज्यातील इयत्ता पहिलीपासूनचे वर्ग सुरू केले जाणार आहेत. सध्या ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता पुन्हा शाळांमध्ये जाऊन शिक्षणाचा आनंद घेता येणार आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्याकडून गुरूवारी पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. शाळा सुरू करताना विद्यार्थ्यांची सुरक्षा व आरोग्याची काळजी घेतली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मागील वर्षी मार्च महिन्यात देशात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यानंतर लॉकडाऊन जाहीर कऱण्यात आला होता. तेव्हापासून राज्यातील शाळा व महाविद्यालये बंद करण्यात आली होती. मागील वर्षीपासून ऑनलाईन वर्ग घेतले जात होते. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत गेल्यानंतर सुरूवातीला महाविद्यालये आणि शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे एक डिसेंबरपासून राज्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळा ऑफलाईन पध्दतीने सुरू होणार आहेत.

School
भाच्याला ईडीची नोटीस येताच ममता पंतप्रधान मोदींच्या भेटीला!

वर्षा गायकवाड यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. गायकवाड म्हणाल्या, कोरोना रुग्णांची संख्या कमी असल्याने मंत्रिमंडळाच्या बैठकीत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार ग्रामीण भागातील पहिली ते चौथीपर्यंत आणि शहरी भागातील पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा एक डिसेंबर पासून सुरू करण्याचा निर्णय गेण्यात आला आहे.

राज्यात ग्रामीण भागात आधीपासूनच पाचवीनंतरच्या आणि शहरी भागात आठवीनंतरच्या शाळा उघडण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता राज्यात पुन्हा एकदा शाळांची घंटा वाजणार आहे. मागील दीड वर्षांहून अधिक काळापासून विद्यार्थ्यांचे वर्ग ऑनलाईन पध्दतीने सुरू आहेत. आता पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत जाऊन शिक्षण घेता येणार आहे. त्यामुळे शाळांमध्ये चिमुकल्यांना किलबिलाट ऐकायला मिळणार आहे.

शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेविषयी बोलताना गायकवाड म्हणाल्या, येणाऱ्या काळात आम्ही चर्चा करू. उद्या अधिकाऱ्यांशी आम्ही बोलणार आहोत. आठ दिवस आम्ही पालकांशी चर्चा करणार आहोत. सुरक्षित वातावरण कसे देता येईल यावर भर दिला जाईल. याबाबतची नियमावली जाहीर केली जाईल. त्यानुसार शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणार आहे, असं गायकवाड यांनी स्पष्ट केलं.

Related Stories

No stories found.