Congress News : ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर काँग्रेसने भूमिका बदलली? 'सत्याग्रह' यात्रेत असणार सावरकरांचे छायाचित्र

Rahul Gandhi News : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान केल्याचा आरोप करत भाजपने टीका केली होती.
Congress
CongressSarkarnama

Congress News : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान केल्याचा आरोप करत भाजपने टीका केली होती. त्यानंतर राज्यात भाजप आणि शिवसेनेच्या (शिंदे गट) वतीने राज्यात सावकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे. मात्र, ठाणे जिल्ह्यातून सुरुवात होणाऱ्या काँग्रेसच्या सत्याग्रह यात्रेत सावरकर यांच्या छायाचित्राला स्थान देण्यात येणार आहे. अशी माहिती काँग्रेसचे (Congress) ठाणे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी गुरुवारी दिली.

मी सावरकर नाही, मी माफी नागणार नाही, असे विधान काँग्रेसचे माजी खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केले होते. या विधानानंतर राहुल गांधी यांच्यावर भाजपने टीका केली. राहुल गांधी यांनी सावरकर यांचा अवमान केल्याचा, आरोप करत राज्यात सत्ताधारी पक्षाने आक्रमक भुमिका घेतली. तसेच महाविकास आघाडीमध्ये असलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राहुल गांधी यांना इशारा दिला होता.

Congress
Rahul Gandhi News : राहुल गांधी आणि प्रियंका गांधींची नागपूरमध्ये होणार सभा; काँग्रेस फुंकणार रणशिंग

ठाणे जिल्ह्यातून सुरुवात होणाऱ्या काँग्रेसच्या सत्याग्रह यात्रेत इतर स्वातंत्र्यवीरांबरोबरच सावरकर यांच्या छायाचित्रालाही स्थान देण्यात येणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. भारत जोडो यात्रा आणि त्यानंतर झालेल्या हात जोडो अभियानानंतर आता जय भारत सत्याग्रह हा कार्यक्रम करण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला आहे. या यात्रेची सुरुवात ठाणे जिल्ह्यातून होणार आहे.

Congress
Durga Bhosle Shinde Death : युवासेनेच्या रणरागिणी दुर्गा भोसले-शिंदेंच्या अंत्यविधीसाठी ठाकरे कुटुंबीय दाखल !

या संदर्भात बोलताना काँग्रेसचे ठाण्याचे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण म्हणाले, राहुल गांधी हे आमच्या पक्षातील मोठे नेते आहेत. त्यांचे आदेश शिरसावंद आहेत. मात्र, आमच्या पक्षात लोकशाही आहे, त्यामुळे आम्हाला मत मांडण्याचा अधिकार असतो. राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याविषयी व्यक्त केलेले मत हे वैयक्तीक होते. ते पक्षाचे मत नाही. महाराष्ट्रात राहत असल्यामुळे सावरकरांविषयी आम्हालाही अभिमान आहे. त्यामुळेच सत्याग्रह यात्रेत त्यांच्या छायाचित्राला स्थान असेल, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com