भाजपनेच आपले आमदार सांभाळावेत ; घोडेबाजारावरुन सतेज पाटलांचा टोला

भाजपमधील किमान तीस आमदार हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये होते. त्यामुळे भाजपने आपले आमदार सांभाळले पाहिजे," असे सतेज पाटील म्हणाले.
भाजपनेच आपले आमदार सांभाळावेत ; घोडेबाजारावरुन सतेज पाटलांचा टोला
Satej Patilsarkarnama

मुंबईत : राज्यसभा निवडणुकीसाठीचा (Rajya Sabha Election) शुक्रवारी अर्ज मागे घेण्याची वेळ संपेपर्यंत कोणीही आपला अर्ज मागे घेतला नाही. महाराष्ट्रातील ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महाविकास आघाडीचं नेते हे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या 'सागर' या निवासस्थानीही गेले होते. पण तरीही या चर्चेतून कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे राज्यसभा निवडणूक होणार हे आता स्पष्ट झालं आहे.

"महाविकास आघाडीची एकत्र ताकद या निवडणुकीत यश संपादन करेल. भाजपने राज्यसभेची निवडणूक लादलेली आहे. गेल्या वीस वर्षात ही निवडणूक बिनविरोध होत होत्या. यंदाही ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी आघाडीने प्रयत्न केला पण त्याला यात यश आले नाही.पण आमचा विजय नक्की होईल," गृहराज्यमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी सांगितले. ते माध्यमांशी बोलत होते.

"या निवडणुकीत घोडेबाजार होईल का, या प्रश्नावर सतेज पाटील म्हणाले, "महाविकास आघाडीला अजिबात धोका नाही, कारण भाजपमधील किमान तीस आमदार हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये होते. भाजपचे आमदार फुटतील. त्यामुळे भाजपने आपले आमदार सांभाळले पाहिजे," असे सतेज पाटील म्हणाले.

"राज्यसभेच्या उमेदवारीवरुन कोणीही नाराज नाही, कारण इमरान प्रतापगडी हे राष्ट्राय पातळीवर काम करणारं नेतृत्व आहे, ते अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष आहेत.भाजपच्या विखारी प्रचाराला काँग्रेस प्रभावीपणे उत्तर देण्याचा प्रयत्न करीत आहे. विरोधीपक्ष म्हणून काँग्रेसची भूमिका प्रबळ राहिल," असे सतेज पाटील यांनी स्पष्ट केलं.

महाविकास आघाडीने देखील या निवडणुकीसाठी कंबर कसली. निवडणूक होणार हे निश्चित होताच महाविकास आघाडीची एका अत्यंत महत्त्वाची बैठक 'वर्षा'वर पार पडली.

Satej Patil
प्रत्येकवेळी हिंदूंनी गोळ्या खायच्या का ? संरक्षण देणे शक्य नसेल तर बंदुका द्या ; मनसे आक्रमक

महाविकास आघाडीच्या या बैठकीत राज्यसभेसाठी लागणारं संख्याबळ आणि आकड्यांवर प्राथमिक चर्चा झाली. तिन्ही पक्षातील प्रतिनिधींची एक तज्ज्ञ कमिटी बनविण्यात येईल. ही कमिटी पक्षांतील आमदारांना मतदान कसे करायचे याबाबत सविस्तर माहिती दिली. याच बैठकीत घटक पक्षांबाबत देखील सविस्तर चर्चा झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in