उदयनराजेंनी केली व्यावसायिक मिळकतधारकांची तीन महिन्यांची घरपट्टी माफ

कडक लॉकडाउन सुरु राहिल्याने सर्वसामान्यांबरोबरच व्यावसायिकांचे अर्थच्रक धोक्‍यात आले होते. या काळातील बिगर निवासी मिळकतधारकांची तीन महिने घरपट्टी माफ करण्याचा विषय सातारा पालिकेच्या सभेपुढे ठेवलेल्या विषयाला बहुमताने मंजुरी मिळाल्यानंतर तो प्रस्ताव खासदार उदयनराजे भोसले यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर केला होता.
Satara Municipality waives property tax on traders
Satara Municipality waives property tax on traders

सातारा : सातारा शहरातील बिगर निवासी मिळकतधारकांना लॉकडाउन कालावधीतील (Lock Down) तीन महिन्यांची घरपट्ठी माफ करण्याचा निर्णय सातारा पालिकेने (satara Palika) विशेष सभेत घेतला होता. या निर्णयानुसार शहरातील सहा हजार 697 मालमत्ताधारकांना सुमारे 71 लाख 57 हजार 13 रुपयांची सुट देण्याची प्रक्रिया पालिकास्तरावर सुरु झाल्याची माहिती साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी दिली आहे. (Satara Municipality waives property tax on traders)

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पुकारलेल्या लॉकडाउनमुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. सुमारे तीन महिन्यांहून अधिक काळ कडक लॉकडाउन सुरु राहिल्याने सर्वसामान्यांबरोबरच व्यावसायिकांचे अर्थच्रक धोक्‍यात आले होते. या काळातील बिगर निवासी मिळकतधारकांची तीन महिने घरपट्टी माफ करण्याचा विषय सातारा पालिकेच्या सभेपुढे ठेवलेल्या विषयाला बहुमताने मंजुरी मिळाल्यानंतर तो प्रस्ताव खासदार उदयनराजे भोसले यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर केला होता. 

यात बिगरनिवासी तसेच निवासी मिळकतधारकांना तीन महिन्यांची घरपट्टी माफी देण्याची मागणी केली होती. निवासी मिळकतधारकांच्या सवलतीच्या अनुषंगाने सध्या मंत्रालयीनस्तरावर कार्यवाही सुरु असल्याचेही उदयनराजे यांनी पत्रकात नमुद केले आहे. निवासी मिळकतधारकांना घरपट्टी माफी देण्याचा निर्णय होईपर्यंत नगरपरिषद कायद्यातील तरतुदींच्या आधारे सन 2020-21 या आर्थिक वर्षातील तिमाही बिगर निवासी मिळकतींचा मालमत्ता कर माफीची अंमलबजावणी सातारा पालिकेने सुरु केली आहे. 

पहिल्या टप्प्यात याचा 6 हजार 697 बिगरनिवासी मिळकतधारकांना फायदा होणार असून त्यांचा सुमारे 71 लाख 57 हजार रुपयांचा मालमत्ता कर माफ होणार आहे. केंद्राकडून अतिरिक्‍तनिधी मिळवत प्रशासकीय खर्चात बचत करत घरपट्टीमाफीतून होणारी तुट भरुन काढण्यात येणार असल्याचेही उदयनराजेंनी पत्रकात नमुद केले आहे. 

राज्यातील पहिली पालिका... 
लोकसंख्येच्या तुलनेत पालिकेचे मुनष्यबळ कमी पडत आहे. उपलब्ध मनुष्यबळ, यंत्रणा याची सांगत घालत शहरातील विकासकामांसाठी केंद्र,राज्याकडून जास्तीचा निधी आणण्यात येत आहे. शहरातील सर्व घटकांना विचारात घेत त्यांच्यासाठीची विकासकामे राबविण्यावर सातारा विकास आघाडीचा भर आहे. व्यापकहित लक्षात घेत अशाप्रकारे घरपट्टीमाफ करणारी सातारा पालिका हि राज्यातील पहिली पालिका असल्याचेही खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकात नमुद केले आहे.  

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com