सातारा जिल्हा बँक नाबार्डच्या 'उत्कृष्ट कार्यक्षमता' पुरस्काराने सन्मानित
Satara District Bank honored with NABARD's 'Outstanding Performance' Award

सातारा जिल्हा बँक नाबार्डच्या 'उत्कृष्ट कार्यक्षमता' पुरस्काराने सन्मानित

नाबार्डने आपल्या ४० व्या स्थापनादिनानिमित्त उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा बॅंकांना पुरस्काराने सन्मानित केलेआहे.

सातारा : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बॅंक नाबार्ड यांच्या वतीने दिला जाणारा उत्कृष्ट कार्यक्षमतेबद्दलचा बेस्ट परफॉर्मन्स बॅंक पुरस्कार या वर्षी सातारा जिल्हा बॅंकेला सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्काराचे ऑनलाइन वितरण केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते बॅंकेचे अध्यक्ष, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, उपाध्यक्ष सुनील माने आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांना देण्यात आला. या वेळी देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम उपस्थित होते. Satara District Bank honored with NABARD's 'Outstanding Performance' Award

शिवेंद्रसिंहराजे भोसले, डॉ. राजेंद्र सरकाळे म्हणाले, जिल्हा बॅंकांच्या देशाच्या कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासामधील महत्त्वपूर्ण योगदानासाठी नाबार्ड आपल्या ४० व्या स्थापनादिनानिमित्त उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा बॅंकांना पुरस्काराने सन्मानित करत आहे. याकरिता प्रामुख्याने शेतीसाठी कर्जपुरवठ्यामधील सहभाग, वंचित घटकांना बॅंकिंग प्रवाहात समाविष्ट करणे, महिला सक्षमीकरण, तंत्रज्ञानाचा अवलंब, बॅंकांची आर्थिक प्रगती, कर्ज वितरण व वसुलीमधील सातत्य, उत्कृष्ट नफा या निकषांवर हा पुरस्कार दिला आहे. 

या निकषाच्या आधारे जिल्हा बॅंकेने सातत्याने बॅंकिंग व नॉन बॅंकिंग क्षेत्रात केलेल्या प्रगतीमुळे हा पुरस्कार देण्यात आला आहे. बॅंकेने शेतकरी सभासदांना तीन लाखांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याजदराने, तसेच ३० लाखांपर्यंतचे शैक्षणिक कर्ज शून्य टक्के व्याजदाराने उपलब्ध करून दिले आहे. बॅंक पातळीवर शंभर टक्के कर्जवसुली करणाऱ्या संस्थांना अकरा वर्षांपासून दर वर्षी २६ ते २९ हजार रुपयांप्रमाणे आजपर्यंत दोन कोटी ८३ लाख वसुली प्रोत्साहन निधी दिला आहे.

शंभर टक्के वसुली करणाऱ्या संस्थांना १५ हजार गौरव निधी उपलब्ध केला आहे. जिल्हा बॅंकेच्या सर्वंकष प्रगती आणि बांधिलकी जपत दिलेले योगदान यामुळेच बॅंकेस या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. या वेळी नाबार्डचे सातारा विभागाचे प्रमुख सुबोध अभ्यंकर यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा सत्कार केला. यावेळी संचालक राजेश पाटील वाठारकर, अर्जुनराव खाडे, दत्तानाना ढमाळ, सुरेखा पाटील, कांचन साळुंखे, प्रकाश बडेकर, शिवरुपराजे खर्डेकर, तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 
 

Related Stories

No stories found.