'मुख्यमंत्रीसाहेब सरपंचाची निवड जनतेतूनच करा'

Chandrashekhar Bawankule|BJP|Mahavikas Aghadi : सरपंच संघटनेनेही सरपंचाची निवड निर्वाचित सदस्यांमार्फत करण्यास विरोध दर्शवला होता.
Chandrashekhar Bawankule Latest News
Chandrashekhar Bawankule Latest NewsSarkarnama

Chandrasekhar Bavankule : राज्यातील सरपंचांची निवडणूक ही 2017 मध्ये फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे थेट जनतेतूनच करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे (BJP) सरचिटणीस आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bavankule) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे केली आहे. यासंदर्भाताल निवेदन त्यांनी आज (ता.13 जुलै) मुख्यमंत्र्यांना सादर केले आहे. (Chandrashekhar Bawankule Latest Marathi News)

Chandrashekhar Bawankule Latest News
BMC निवडणुकीचं पवारांनी रणशिंग फुंकलं : युतीचा विचार न करता कामाला लागा...

या निवेदनात बावनकुळे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 2017 मध्ये सरपंचाची निवड जनतेतूनच करावी, असा निर्णय घेतला होता. मात्र हा निर्णय महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारने बदलून सरपंचाची निवडणूक ग्रामपंचायतीवर निवडून आलेल्या सदस्यांमार्फत करण्याचा निर्णय घेतला आहे. 2017 पूर्वी सरपंचाची निवड ग्रामपंचायत सदस्यांमार्फतच होत असे, मात्र वारंवार अविश्वास ठराव मांडण्याच्या खेळामुळे ग्रामपंचायतीच्या कामकाजात अडथळे निर्माण होत होता. यामुळे पुन्हा सरपंचाची निवड थेट जनतेतून करावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री शिंदेकडे केली आहे.

Chandrashekhar Bawankule Latest News
.. हाती धुपाटनं आलं, अशी 'स्वाभिमानी' ची अवस्था : सदाभाऊ खोत यांची टीका

पुढे निवेदनात बावनकुळे म्हणाले की, ग्रामपंचायत सदस्यामधून निवड होत असल्याने वारंवार अविश्वास ठराव आणला जात होता. त्यामुळे घोडेबाजाराला ऊत येत असे. मात्रही परिस्थिती टाळण्यासाठी आणि ग्रामपंचायत कारभाराला स्थिरता आणण्यासाठी नेमलेल्या तज्ज्ञ समितीने सरपंचाची निवड जनतेतून करण्याची शिफारस राज्य सरकारला केली होती. या शिफारशीनुसार फडणवीसांच्या नेतृत्वाखालील सरकारने सरपंचाची निवड ही जनतेतून करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय महाविकास आघाडी सरकारकडून बदण्यात आला आहे, असे बावनकुळे म्हणाले.

Chandrashekhar Bawankule Latest News
Shivsena : खैरे गुरुंच्या भेटीसाठी शिवतीर्थावर ; ठाकरे, राऊत, देसाईंनाही दिल्या शुभेच्छा..

दरम्यान, याबाबत राज्य सरपंच संघटनेनेही सरपंचाची निवड निर्वाचित सदस्यांमार्फत करण्यास विरोध दर्शवला होता. आता नवीन शिंदे-भाजप सरकारं आल्याने या सरकारने फडणवीसांच्या काळातीस निर्णय कायम ठेवावा, असे बावनकुळेंनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in