देशपांडेंनी केली कायंदेंची कोंडी, भातखळकरांचे टोले, मिटकरी-तांबेंचे चिमटे अन् दीपाली सय्यदांचा अनोखा अंदाज

Sarkarnama Open Mic Season -2 सरकारनामाच्या कार्यक्रमात रंगली नेत्यांची जुगलबंदी
Sarkarnama Open Mic Season -2 Atul Bhatkhalkar, Amol Mitkari, Deepali Syed, Manisha Kayande
Sarkarnama Open Mic Season -2 Atul Bhatkhalkar, Amol Mitkari, Deepali Syed, Manisha KayandeSarkarnama

मुंबई : महाराष्ट्राचे राजकारण सध्या आरोप-प्रत्यारोपांनी ढवळून निघत आहे. परस्परांबद्दल कमालीचा द्वेेष वाढत आहे. या द्वेषाच्या राजकारणाला दूर करून निकोप राजकीय वातावरण तयार करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून विविध पक्षातील नेत्यांना एकाच व्यासपीठावर आणून एक अगळावेळा कार्यक्रम ‘सरकारनामा’ने नुकताच आयोजित केला. या कार्यक्रमात राजकीय नेते पक्षीय मतभेद विसरुन हास्यकळ्ळोळात रंगले. (Sarkarnama Open Mic Season -2)

‘सरकारनामा ओपन माईक सिजन - 2' कार्यक्रमामध्ये भाजपचे (BJP) नेते अतुल भातखळकर , काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari), बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या नेत्या दिपाली सय्यद, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या आमदार मनीषा कायंदे उपस्थित होत्या. मुंबईतील हॉटेल लॉर्ड ऑफ ड्रिंक्स हे व्हेन्यू पार्टनर होते.

Sarkarnama Open Mic Season -2 Atul Bhatkhalkar, Amol Mitkari, Deepali Syed, Manisha Kayande
2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतरही शिंदे मुख्यमंत्री असतील का? अतुल भातखळकर म्हणतात...

या कार्यक्रमात नेत्यांनी एकमेकांना चांगल्याच कोपरखळ्या मारल्या. तसेच अडचणीचे प्रश्न विचारुन कोंडीही केली आणि हास्यविनोद करत कार्यक्रमात रंगत आणली. कार्यक्रमात नेत्यांनीच नेत्यांना प्रश्न विचारले. त्यावर त्यांची धमाल उत्तरे दिली. तसेच एकमेकांना चांगलेच चिमटेही काढले. राजकारणाच्या पलिकडे जाऊन नेते या कार्यक्रमात रंगून गेले.

कार्यक्रमामध्ये तीन राऊंड होते, पहिल्या राऊंड होता, 'काढा डिटेक्टर' यामध्ये नेत्यांना काही प्रश्न विचारण्यात आले, त्या प्रश्नाचे उत्तर त्यांनी योग्य दिले की नाही हे ठरवण्याची जबाबदारी इतर नेत्यांवरच होती. ते त्यांच्या उत्तराशी सहमत नसतील तर तीन वेळा घंडी वाजवायची, असे सांगितले होते. नेत्याने दिलेल्या उत्तराशी इतर जण सहमत असतील तर त्यांना ज्यूस मिळणार होता. मात्र, जर इतर नेते सहमत नसतील तर त्यांना काढा मिळणार होता. यामध्ये अनेकांना काढा मिळाला. यामध्ये सत्यजीत तांबे यांना एकदाच काढा मिळाला, तर भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांना तीन वेळा आणि दिपाली सय्यद यांना दोन वेळा काढा मिळाला.

Sarkarnama Open Mic Season -2 Atul Bhatkhalkar, Amol Mitkari, Deepali Syed, Manisha Kayande
पुन्हा जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात लढणार का? दिपाली सय्याद यांनी स्पष्टच सांगितले

दुसरा राऊंड होता 'ईडी' म्हणजेच ‘इकडचा डॉन’, या राऊंडमध्ये नेत्यांनीच नेत्यांना प्रश्न विचारायचे होते. त्यामध्ये संदीप देशपांडे यांनी मनीषा कायंदे (Manisha Kayande) यांची कोंडी केली. तर अभिनयात प्राविण्य मिळवलेल्या दिपाली सय्यद राजकारणात तशा नवख्याच आहेत, त्यांना प्रश्न विचारुन इतर नेत्यांनी चांगलेच भांडावून सोडले. दोन प्रश्नावर भाषणात तरबेज असलेल्या अमोल मिटकरी अडखळले.

Sarkarnama Open Mic Season -2 Atul Bhatkhalkar, Amol Mitkari, Deepali Syed, Manisha Kayande
ठाकरेंकडे १५-१६च आमदार; संधी मिळाली तर शिवसेना सोडणार का? कायदेंनी स्पष्टच सांगितले

तिसरा राऊंड होता 'करेक्ट कार्यक्रम' उपस्थितांना काही कार्ड देण्यात आले होते. त्यामध्ये एक कार्ड त्यांनी निवडायचे होते. त्यावर फोटो असलेल्या नेत्याला ट्रोल करायचे होते. यामध्ये शिवसेनेच्या कायंदे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा शेलक्या शब्दांत समाचार घेतला. अतुल भातखळकर यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना ‘ट्रोल’ केले. अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री शिंदेंना चांगलेच टोले लगावले, अशा बिगर राजकीय कार्यक्रमात नेत्यांचा वेगळाच अंदाज बघायला मिळाला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com