Varun Sardesai : भाजप आमदाराने केलेले भ्रष्टाचाराचे आरोप सरदेसाईंनी फेटाळून लावले!

Varun Sardesai : मी मानहाणीचा दावा ठोकला असता, म्हणून ते सभागृहात बोलले.
Varun Sardesai
Varun Sardesaisarkarnama

Varun Sardesai : भाजपचे आमदार योगेश सागर (Yogesh Sagar) यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे निकटवर्तीय व युवा सेनेचे महत्त्वाचे पदाधिकारी वरूण सरदेसाई यांच्यावर विधानसभेतून भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. यावर आता स्वत:सरदेसाई यांनी पत्रकार परिषद घेऊन, सागर यांनी केलेल्या सर्व आरोपांना फेटाळून लावले आहे.

माझ्यावर लावले गेलेले भ्रष्टाचाराच्या आरोपात काडीमात्र तथ्य नसल्याचा दावा सरदेसाई यांनी केला. विधानसभेबाहेर जर आरोप केल्यास, मी त्यांच्यावर दावा ठोकू शकतो, याची आमदार सागर यांना माहिती आहे. त्यामुळेच विधानसभेत त्यांनी माझ्यावर केलेले आरोप, ते सभागृहाबाहेरकरु शकत नाहीत, असेही सरदेसाई म्हणाले.

Varun Sardesai
Bharat Jodo Yatra : "राहुल गांधींमध्ये बदल झाला आहे का?" म्हणाले...

माझ्यावर केले गेलेले आरोप हे सर्व आरोप धादांत खोटे आहेत. मी जिआरची प्रत दाखवतो.ज्या सात ते आठ मुलांची नावे घेतली त्यांना मी ओळखत नाही. त्यांचा माझ्याशी काहीही संबंध नाही. माझ्यावर आरोप करून नीच राजकारण सुरु आहे. ते विधानसभेबाहेर बोलले असते तर त्यांच्यावर मी मानहाणीचा दावा ठोकला असता, म्हणून ते सभागृहात बोलले, असे सरदेसाई म्हणाले.

पत्रकारांना विनंती आहे की त्यांनी केलेल्या आरोपांबाबत तथ्य तपासून बातम्या कराव्यात. आम्ही या सरकारमधील सहा मंत्र्यांचे घोटाळे पुराव्यासहित बाहेर काढले. सहा मंत्र्यांच्या घोटाळ्यांचे पुरावे दिले, तरी त्यांचा राजीनामा घेतला जात नाही. मुद्दाम एखादं पिल्लु सोडायचं आणि विशेष प्रतिनिधी मार्फत बदनामी करायची, असं सुरु आहे.

Varun Sardesai
Jorgewar : आमदार जोरगेवारांच्या मागणीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल, दिला ‘हा’ शब्द !

काय आहेत वरूण सरदेसाई यांच्यावर आरोप ?

भाजपचे आमदार योगेश सागर यांनी शुक्रवारी विधानसभेत सांगितले की, सरदेसाई हे हिंदुस्थान स्काउट्स अँड गाईड्सचे अध्यक्ष होते, तर रूपेश कदम आणि पंकज चौरागडे हे सचिव आणि कोषाध्यक्ष होते.'तरुणांकडून किमान 10 लाख रुपये घेऊन त्यांना गोंदियाला प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले.

गोंदिया येथे एक शाळा बांधण्यात आली व तेथे त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणानंतर, त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले, ज्यामध्ये शाळेतर्फे त्यांना शिक्षक म्हणून नियुक्त करण्यात येईल, असे नमूद करण्यात आले होते. जमीन विकून पैसे उभे करणाऱ्या गरीब शेतकऱ्यांच्या मुलांकडून किमान 8 ते 10 लाख रुपये घेतल्याचा दावा त्यांनी केला.

जेव्हा हे युवक त्यांची नियुक्तीपत्रे घेऊन शाळेत गेले, तेव्हा ते हिंदुस्थान स्काउट्स आणि गाईड्सशी संलग्न नसल्याचे सांगून त्यांना दूर ठेवण्यात आले. चौरागडे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर या पीडित तरुणांचे पैसे सरदेसाई यांना देण्यात आले असून, पैसे पुन्हा मिळाल्यावर परत करण्यात येईल असे सांगण्यात आले, असा आरोप केला गेला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in