ठाकरेंना आव्हान देण्यासाठी मुंबईकडे निघालेल्या संतोष बांगरांकडे शिवसैनिकांनीच फिरवली पाठ

Hingoli | Santosh Bangar| संतोष बांगर यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्हाध्यक्ष पदावरुन हकालपट्टी केली
Santosh Bangar
Santosh Bangar

मुंबई : हिंगोलीचे बंडखोर आमदार संतोष बांगर यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्हाध्यक्ष पदावरुन हकालपट्टी केली. त्यावर त्यांनी आज मुंबईत शक्तिप्रदर्शन करण्याचे आव्हान दिले हाेते. त्यानुसार आज सकाळी ते लोणावळा परिसरात पोहचले. मात्र लोणावळ्यासह मावळ परिसरातील अनेक शिवसैनिकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवल्याचे पाहायला मिळाले.

Santosh Bangar
Hingoli: शिवसेना आक्रमक; संतोष बांगर यांची जिल्हाध्यक्ष पदावरुन हकालपट्टी

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष बांगर काल (११ जुलै) अनेक शिवसैनिकांसह मुंबईत शक्ती प्रदर्शन करण्यासाठी निघाले होते. ते आज सकाळी लोणावळ्यापर्यंत पोहचले. कार्ला परिसरात पोहचल्यानंतर ते ठाकरे कुटुंबाचे आराध्य दैवत असलेल्या एकविरा देवीच्या दर्शनाला जाणार होते. मात्र मुसळधार पावसामुळे त्यांना गडावरील एकवीरेंच दर्शन बांगर यांना घेता आले नाही. पायथ्याशी असलेल्या एकवीरा मंदिरातच त्यांना दर्शन घेत त्यांना समाधान मानावे लागले. इतकेच नव्हे तर, संतोष बांगर मावळ परिसरात पोहचल्यानंतर ही अनेक शिवसैनिकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली. अशात संतोष बांगर यांच्या मावळ दौऱ्यामुळे शिवसैनिकांमध्ये उलट सुलट चर्चा सुरु झाली आहे.

आमदार बांगर हे हिंगोलीचे जिल्हाप्रमुख म्हणून देखील कार्यरत होते. ते शिंदे गटासोबत गेल्यामुळे उद्धव ठाकरेंनी त्यांची जिल्हाप्रमुख पदावरून उचलबांगडी केली. (Hingoli) या कारवाईनंतरही मला शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदावरुन काढलेलं नाही. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीच सांगितलं आहे की, तुच हिंगोली शिवसेनेचा जिल्हाप्रमुख आहे. त्यामुळे कोणत्याही पदाधिकाऱ्याला काढण्याचा अधिकार कोणालाही नाही. शिवसेनेचा, बाळासाहेबांचा झेंडा आम्ही घेऊन चाललो आहोत, त्यामुळे आम्हाला काढण्याचा अधिकाही कोणालाही नाही, असे आव्हान ठाकरेंना दिले होते. एवढ्यावर न थांबता त्यांनी थेट मुंबईत शिवसैनिकांसोबत शक्तिप्रदर्शन करण्यासाठी शेकडो शिवसैनिकांना घेऊन मुंबईकडे निघाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in