Sanjay Raut : संजय राऊतांच्या अडचणी वाढणार?; हक्कभंग नोटिशीला अद्याप उत्तरच नाही

Politics : विधिमंडळ संजय राऊतांविरोधात आता काय कार्यवाही करणार?
Sanjay Raut News
Sanjay Raut News Sarkarnama

Maharashtra Politics : खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळाला 'चोरमंडळ' असं म्हटल्यामुळे राऊत यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव बुधवारी (1 मार्च 2023) दाखल करण्यात आला. त्यानंतर विधानसभा सचिवांकडून १ मार्चला नोटीस जारी करण्यात आली.

संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर विधीमंडळाने ४८ तासांत लेखी म्हणणे मांडण्यासंदर्भात त्यांना नोटीस बजावली. मात्र, त्या हक्कभंग नोटीसला राऊतांकडून अद्याप काहीही उत्तर देण्यात आले नाही. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Sanjay Raut News
Sanjay Raut : हक्कभंग समिती राऊतांची चौकशी करेल; पण कारवाईचे अधिकार विधिमंडळाला आहेत का?

संजय राऊत यांना विधिमंडळाने ४८ तासांमध्ये आपलं म्हणणं लेखी मांडण्याची नोटीस दिली होती. शुक्रवारी संध्याकाळी राऊतांची खुलासा सादर करण्याची मुदत होती. मात्र, आता मुदत संपली आहे तरी देखील त्यांनी कोणतंही उत्तर दिलं नाही.

त्यामुळे आता विधिमंडळाकडून संजय राऊत यांच्याविरोधातील पुढील कार्यवाही करण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच विधीमंडळाकडून राऊतांना स्मरण पत्र पाठवण्यात येण्याची शक्यता आहे.

Sanjay Raut News
Nana Patole : नाना पटोलेंनी आता होळीला नमस्कार करून प्रार्थना करावी, असं का म्हणाले बावनकुळे?

दरम्यान, संजय राऊतांनी विधिमंडळाबाबत बोलताना 'चोरमंडळ' असं वक्तव्य केलं. त्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका झाली. त्यानंतर त्यांना हक्कभंग नोटिस बजावण्यात आली.

मात्र, त्यांनी या नोटीसला काहीही उत्तर दिलं नाही, त्यामुळे आता विधिमंडळ त्यांच्याविरोधात पुढे काय कार्यवाही करणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com