Sanjay Raut VS BJP : फडणविसांवर पहिल्यांदाच इतका मोठा आरोप

संजय राऊत Sanjay Raut यांचा भाजपविरोधात मोठा बाॅम्ब
Sanjay Raut, Devendra Fadnavis
Sanjay Raut, Devendra Fadnavis sarkarnama

मुंबई : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यांच्या काळात महाआयटीमध्ये सुमारे 25 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा घणाघात केला. त्यातील पाच हजार कोटी रुपयांचे हिशोब आपल्याकडे असल्याचे त्यांनी सांगितले. मोहित कंबोज हा फडणवीस यांचा फ्रंट मॅन होता.  तो फडणवीस यांना घेऊन बुडणार असल्याचा दावा राऊत यांनी केला. ईडीचा वापर करून महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि झारखंड येथील सरकारे पाडण्याचा कट असल्याच्या आरोपाचा त्यांनी पुनरूच्चार केला. फडणवीस, सोमय्या पिता-पुत्र आणि मोहित कंबोज अशा चौघांनी त्यांनी आज लक्ष्य केले. 

कोण अर्धा, कोण पाव हे तुम्हाला उद्यापासून कळेल.. 

राकेश वाधवान याच्यापासून 12 हजार कोटी रुपयाची जमीन मोहित कंबोजने 100 कोटी रुपयांत खरेदी केली आहे. 

मोहित कंबोज हा फडणवीसांचा फ्रंट मॅन आहे. तो फडणविसांना बुडविणारा आहे. 

हा फक्त ट्रेलर आहे. आणखी काही व्हिडीओ, कागदपत्रे पुढे येतील. काही लोक दिल्लीला गेले आहेत. माझे जीवन संघर्षात गेले आहे. मी घाबरणारा नाही. 

हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. हम डरेंगे नही, झुकेंगे नाही. कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात ठाकरे सरकार राहणार. 2024 मध्ये सत्ता परिवर्तन होणार. 

त्या रात्री मी अमित शहांना फोन केला होता. जे चाललयं ते ठिक नाही, हे मी त्यांना सांगितलं. तुम्ही माझ्या मित्रांना, नातेवाईकांना, मुलांचा छळ करू  नका, असे मी त्यांना म्हटले होते. 

हीच तुमची लोकशाही आहे का, असा माझा मोदी आणि शहांना सवाल आहे.

ईडीच्या लोकांनी 80 वर्षांच्या वृद्धाला पकडून नेले. तो रडत होता. 

महाराष्ट्र, बंगाल आणि झारखंड येथील सरकारे पाडण्याचे कारस्थान

ED चे अधिकारी काय करतात, काय खातात, काय पितात हे संपूर्ण देशाला सांगणार. मी घाबरणारा नाही. 

मुंबईतील प्रतिष्ठित बिल्डरांकडून ईडीच्या नावाखाली वसुली सुरू आहे. मुंबईतील साठ बिल्डरांकडून तीनशे कोटींची वसुली. 

जितेंद्र चंद्रालाल नवलाणी हा कोण आहे? हे नाव ऐकून दिल्लीतील ईडीच्या लोकांना श्वास रोखेल. 

मैं नंगा आदमी हूं. शिवसैनिक हो...

PMC बॅंक घोटाळ्याचा तपास ईडी करत आहे. सोमय्या यांच्या भ्रष्टाचाराचे कागद मी ईडीला पाठवले आहेत. हा सोमय्या ईडीच्या कार्यालयात दही आणि खिचडी खातो. तुम्ही तेथे मराठी माणसाला बोलविणार. हे सारे लोक ईडीचे वसुली एजंट बनले आहेत. 

राजेंद्र लखाणी हा सोमय्या यांचा फ्रॅंटमॅन आहे. 

महाराष्ट्र लुटायचा, मुंबई लुटायची हे यांचे धोरण. हा किरीट सोमय्या भाजपचा मुंबईतील चेहरा आहे. 

किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांना तातडीने अटक करा. 

निकाॅन कन्स्ट्रक्शनमार्फत दोन ठिकाणी जमीन घेतली. या कंपनीचे सर्व प्रकल्प रद्द करा, असे माझे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना आवाहन आहे.  

निकाॅन इन्फ्रा कन्स्ट्रक्शन कोणाची आहे? ही सोमय्यांची कंपनी आहे. PMC घोटाळ्यातील आरोपी वाधवान याला ब्लॅकमेल करून सोमय्यांनी 80 ते 100 कोटी रुपयांची रोकड  घेतली. 

ईडी, सीबीआय, पंतप्रधान हे माझी प्रेस काॅन्फरन्स ऐकत आहेत. 

PMC बॅंक घोटाळ्यातील पैसे मी वापरत असल्याचा सोमय्या सांगतात. पण त्यातील राकेश वाधवानने वीस कोटी रुपये भाजपच्या अकौंटमध्ये गेले आहेत. 

फडणविसांच्या काळातील पाच हजार कोटींच्या घोटाळ्याचा हिशोब माझ्याकडे. आधी EOW कडे तक्रार करणार आणि नंतर हे प्रकरण ईडीकडे जाणार 

महाआयटीमध्ये पाच हजार कोटींचा घोटाळा

फडणवीस यांच्या काळात महाराष्ट्रात 25 हजार कोटींचा घोटाळा झालाय. 

एक दूधवाला पाच वर्षांत सात हजार कोटींचा मालक कसा झाला? 

मुलीच्या लग्नातील टेलरकडेही ईडीचे लोक गेले होते. 

मी जेलमध्ये जायला तयार आहे - संजय राऊत

माजी वनमंत्री सुधीर मुनगंटिवार यांच्या मुलीच्या लग्नाबद्दल आम्ही काही बोललो का? त्यांच्या मुलीच्या लग्नातील सेट साडेनऊ कोटी रुपयांचा होता. 

माझ्या मुलीच्या लग्नातील फुलवाले, फटाकेवाले, नेल पाॅलिश करणारे, मेहंदी लावणारे यांच्याकडे ते गेले. 

माझ्या 55 गुंठे जमिनीचा तपास ईडी करत आहे. एकूण 30 ते 40 लाखांच्या पुढे हा  व्यवहार नसेल. माझ्या नातेवाईकांना त्रास देण्याचे काम सुरू आहे. माझ्याविरुद्ध स्टेटमेंट देण्यासाठी त्यांच्यावर दबाव आहे. 12-14 तास त्यांना डांबून ठेवण्यात आले. धमक्या देतायत, दादागिर करतायत. तिहारच्या जेलमध्ये टाकण्याची धमकी देत आहेत.

माझे वीस वर्षांचे बॅंकेचे स्टेटमेंट ईडीवाले घेऊन गेले. 

सरकार पडू देणार नाही. प्राण जाय पर वचन न जाय. त्यांनी केलेला  प्रत्येक आरोप खोटा आहे.  

बाराव्या खरेदीदाराकडून पाटणकर यांनी जमीन घेतली आहे. देवस्थानाकडून आम्ही खरेदी केली आहे? अजिबात नाही. 

उद्धव ठाकरे यांचे सासरे सु. ल. पाटणकर यांनी कर्जतमध्ये देवस्थानची जागा घेतल्याचा आरोप या भडव्याने केला होता. पाटणकरांनी जमीन विकत घेतल्याबद्दल मी त्याला आव्हान दिले होते. 

मुंबईत मराठी भाषा सक्तीची असू नये, यासाठी किरीट सोमय्या उच्च न्यायालयात गेला होता. हाच भडवा, दलाल आमच्या मराठी भाषेविरुद्ध कोकलतो.  

उद्धव ठाकरे यांनी बांधलेले 19 बंगले आहेत कोठे? खोटेपणा, भंपकपणा, मराठी माणसाविषयीचा द्वेष यातून दिसतो. 

माझे त्या दलालाला आव्हान आहे. आपण चार बसेस करू आणि ठाकरे यांनी बांधलेल्या बंगल्यात ट्रीप काढू. जर ते बंगले तुम्हाला दिसले तर मी राजकारण सोडेन आणि नाही दिसले तर त्या दलालाला शिवसेना जोड्याने मारेन.

मुलुंडचा दलाल त्याला आपल्या भाषेत दलाल म्हणतात तो रोज बोंबलतोय.

उद्धव ठाकरे यांच्याविरोधात काय प्रकरण आहे, हे आता मी तुम्हाला सांगतो. 

हे बाहेरचे लोक आमच्याकडे येऊन दादगिरी करणार आणि आमच्या बायकामुलांकडे वाकड्या नजरेने पाहणार, असे कधी घडले नव्हते. 

आजची पत्रकार परिषद ईडीच्या कार्यालयासमोर घेण्याची इच्छा होती. 

उद्धव ठाकरे यांना अडकविण्याचा प्रयत्न झाला. आपण शिवसेनेकडून कधी उत्तर दिले नाही. पण आता आपण ते देणार आहोत. 

मुलांना फोन करून धमकविण्याचा प्रयत्न. इतकं निर्घुण राजकारण झालं नसेल. पण भाजपने ते केलयं. 

मराठी माणसाने धंदा करूच नये, असे यांना वाटते

बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला गुडघे टेकायला शिकवले नाही. असे मी त्यांना सांगितले की माझ्या आजूबाजूच्या लोकांना अडकावयचा प्रयत्न केला.

महाराष्ट्रात सरकार पाडायचा प्रयत्न झाला तर ठिणगी पडेल, असे मी त्यांना सांगितले. मी नकार दिल्यानंतर त्याच्या तिसऱ्या दिवसापासून धाडी पडायला सुरवात झाली. त्या आधी मुलुंडचा दलाल पत्रकार परिषद घेतो. तुमचे सरकार महाराष्ट्रात आले नाही त्यासाठी तुम्ही केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करता.

तुम्ही काही लोकांनी आम्हाला मदत केली नाही तर केंद्रीय तपास यंत्रणा आम्हाला टाईट करतील, असा शब्द त्यांनी वापरला. तुम्हाला नंतर पश्चाताप होईल, आम्हाला मदत न केल्याचा असा इशारा भाजप नेत्यांनी दिला. मात्र ठाकरे सरकारला नख लागेल, असे कोणतेही कृत्य माझ्याकडून घडणार नाही, असे मी त्यांना सांगितले. पवार कुटुंबियांवरही छापे पडू लागले. पवार कुटुंबियांच्या मुलींच्या घरात छापे पाडून तेथे अशाच धमक्या दिल्या गेल्या.

भारतीय जनता पक्षाचे प्रमुख लोक मला भेटले. तुम्ही या सरकारच्या प्रवाहातून बाहेर पडा, असे त्यांनी मला सांगितले. एक तर आम्ही राष्ट्रवादी राजवट आणू. तुम्ही मध्ये पडू नका. तुम्ही आम्हाला मदत करा, असे या भाजप नेत्यांनी मला सांगितले.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 170 चे बहुमत असताना सरकार पडण्याच्या तारखा कशाच्या आधारावर देता? मी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र दिले. त्यापासून यास सुरवात झाली. केंद्रिय यंत्रणा माझ्यासारख्या खासदाराला कसा त्रास देत आहेत, हे मी त्यात लिहिले. 

महाराष्ट्रातील सरकार त्यांना घालवायच आहे. त्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. एकदम तु्म्ही सरेंडर, व्हा गुडघे टेका. अशा धमक्या सतत दिल्या जात आहेत.

शिवसेना असेल, ठाकरे परिवार असेल, आमचे आनंदराव अडसूळ असतील, रवींद्र वायकर, अनिल परब, भावना गवळी, राष्ट्रवादीचे प्रमुख, पवार कुटुंबीय यांच्यावर ज्या पद्धतीने हल्ले सुरू आहे. हे देशावरचे संकट आहे. पश्चिम बंगालमध्येही असेच चालले आहे.  

महाराष्ट्र ही गांडूची अवलाद. मराठी माणूस नामर्द नाही. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना येथूनच नमस्कार करतो. ते वर्षा बंगल्यावरून पत्रकार परिषद पाहत आहेत. शरद पवार यांचा फोन होता. महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांचा मला फोन केला. सर्व नेत्यांनी मला आशिर्वाद दिले आहेत. तुम्ही पुढे जा, मराठी माणसावर ज्या पद्धतीने आक्रमण सुरू आहे त्या आक्रमणाविरुद्ध कोणीतरी रणशिंग फुंकायला हवं होते. ते ऐतिहासिक काम करायला हवं. तू काही पाप केलं नसशील तर कोणाच्या बापाला घाबरू नका, असे बाळासाहेब ठाकरे आम्हाला नेहमी सांगायचे. त्याच पद्धतीने उद्धव ठाकरे हे सांगत आहेत.

या वास्तूच्या खाली बाॅम्बस्फोट झाले आहेत. ज्यांनी शिवसेनाप्रमुखांसोबत काम केले आहे, असे अनेक नेते माझ्यासोबत आहेत. : संजय राऊत

पत्रकार परिषद सुरू; मला वाटत ही आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषद आहे : संजय राऊत

संजय राऊत स्थानापन्न झाले. 

Sanjay Raut press conference
Sanjay Raut press conferencesarkarnama

संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्रकार परिषदेनिमित्त सेना भवन येथे जमलेली शिवसैनिकांची गर्दी

खासदार अनिल देसाई आले

पाच ते दहा मिनिटांत पत्रकार परिषद सुरू होणार.

भाजपनेही केली प्रत्युत्तराची तयारी. सुधीर मुनगंटिवार देणार राऊतांना उत्तर. 

संजय राऊत (Sanjay Raut) यांचे एखाद्या हिरोप्रमाणे आगमन. गाडीतूनच गर्दीला हात दाखवत अभिवादन

पोलिस कोठडीत जाणारे भाजपचे साडेतीन नेते कोण, याची उत्सुकता शिगेला

Sanjay Raut pC
Sanjay Raut pCsarkarnama

Sanjay Raut press conference सेना भवनात दारूगोळा दाखल

संजय राऊत यांची  पत्रकार परिषद म्हणजे सिक्सर आहे - सुप्रिया सुळे 

अभी तो टॉस हुआ है - आदित्य ठाकरे

सेनेचे खासदार आमदार नगरसेवक सेना भावनला दाखल होऊ लागलेत. सेना भवन मध्ये केवळ खासदार आमदार मंत्री आणि नेत्यांना प्रवेश दिला जात आहे. सगळ्याच नेत्यांनी पत्रकारांशी बोलण्यास नकार दिला. सगळं,राऊत साहेब बोलतील, अश्या प्रतिक्रिया सर्व जण देत आहेत.

कणकवलीत वातावरण तापल. राणेसमर्थ कणकवलीत आक्रमक नारायण राणेंच्या बांगल्याबाहेर समर्थक एकवटले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काँग्रेसने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या घराबाहेर आंदोलन करणार असल्याचा इशारा काल दिला होता. मात्र काँग्रेसच्या आंदोलना पूर्वीच राणे समर्थक झाले आक्रमक राणेंच्या बांगल्याबाहेर समर्थकांची कॉंग्रेस आणि नाना पटोले यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी राणेंच्या घराबाहेर श्रीफळ वाढवून घातले मालवणीत गाऱ्हाणे.  कॉंग्रेसला सद्बुद्धी देरे महाराजा असे म्हणत रामेश्वराला  घातले गाऱ्हाणे.

संजय राऊतांच्या स्फोटक पत्रकार परिषदेआधी  मुंबईसह पुण्यात ED पाठोपाठ आता CBI च्या टिमचीही छापेमारी. यस बॅंक आणि DHFL च्या 20 हज़ार कोटीहून अधिकच्या घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई सुरू आहे.   CBI कडून मुंबई आणि पुण्यात ही कारवाई सुरू आहे.  हे संपूर्ण प्रकरण एका विकासकाशी संबधित असल्याची प्राथमिक माहिती CBI सूत्रांकडून मिळते आहे. 

नाशिक येथून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदे साठी नाशिक येथून शेकडो सैनिक उपस्थित.

संजय राऊत आज चार वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत आणि या पत्रकार परिषदेस आणि शिवसेनेतील बडे नेते आमदार खासदार कार्यकर्ते उपस्थित होत आहेत. त्याच प्रकारे आता आमदार वैभव नाईक हेदेखील शिवसेना भवन येथे राऊत यांना पाठिंबा देण्यासाठी दाखल झाले आहेत.

संजय राऊत यांची गाडी शिवसेना भवनात येत आहे.

शिवसेना बाहेर आता कार्यकर्त्यांची गर्दी पाहिला मिळतये .. आता झुकणार नाही अस त्यांचे म्हणणे आहे.. 

संजय राऊत यांच्यावरील हल्ल्याला सुधीर मुनगंटिवार हे उत्तर देणार. राऊत यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर मुनगंटिवार यांचा पाच वाजता पत्रकार परिषद

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com