
Mumbai : राज्यातील सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालय आज (दि.११) निकाल देणार आहे. याचवेळी राज्यातील १४५ आमदारांचं पाठबळ जोपर्यंत त्यांच्याकडे आहे, तोपर्यंत शिंदे फडणवीस सरकारला धोका आहे असं म्हणण्यात अर्थ नाही असं रोखठोक मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केलं. यावर ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत(Sanjay Raut) यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर भाष्य केलं आहे. यावेळी राऊत म्हणाले, या सरकारला धोका नाही असं कुणी कसं काय म्हणू शकतो. पण अजित पवारांचं सरकारला धोका नाही असं म्हणणं हे त्यांचं वैयक्तिक मत आहे.
ते राज्याचे विरोधी पक्षनेते असले तरी मी महाविकास आघाडीचा नाही तर ठाकरे गटाचा नेता म्हणून जो की आम्ही विरोधीपक्षात आहोत. आणि मला पूर्ण खात्री आहे की, मुख्यमंत्री आणि १६ आमदार अपात्र ठरले की उर्वरित २४ जणही आपोआप अपात्र ठरतील . आणि यानंतर हे शिंदे फडणवीस सरकार एकक्षणभरही राहणार नाही असा दावाही राऊत यांनी व्यक्त केलं.
...हे घटनाबाह्य सरकार कोसळणारच !
देवेंद्र फडणवीसां(Devendra Fadnavis)सह शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आमच्या बाजूने लागणार असल्याचा दावा केला आहे. यावर राऊतांनी सडकून टीका केली. राऊत म्हणाले, या देशात लोकशाही आहे की नाही, न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे की नाही आजच्या निर्णयावर ठरणार आहे. पण आम्ही न्यायालयाच्या निकालाबाबत आशावादी आहोत. पण काही जण निकाल आमच्या बाजूने लागणार असा दावा करत आहेत. ते मूर्ख आहेत. असा दावा ते कसा काय करु शकतात. त्यांच्या दाव्यात काहीही तथ्य नाही. हे घटनाबाह्य सरकार कोसळणारच आहे असा विश्वासही राऊतांनी यावेळी बोलून दाखविला.
जयंत पाटलांच्या ईडीच्या नोटिशीवर राऊत म्हणाले...
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश नोटीशीतून देण्यात आले आहेत. आयएल आणि एफएस प्रकरणी जयंत पाटलांना नोटीस धाडल्याची माहिती मिळत आहे. आज सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालय देणार आहे. अशातच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आलेली ईडीची नोटीस यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे
यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस देण्यात आली आहे. यावर संजय राऊतांनी एकाच ओळीत उत्तर दिले. जयंत पाटील यांच्या ईडीच्या नोटिसीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते भाष्य करतील असं संजय राऊतांनी यावेळी सांगितलं.
(Edited By Deepak Kulkarni)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.