Sanjay Rajt Bail| संजय राऊतांचा तुरुंगातील मुक्काम वाढला; पुढील सुनावणी 9 नोव्हेंबरला

Sanjay Rajt Bail| संजय राऊत यांनी माध्यमांशी किंवा कार्यकर्त्यांकडे काही प्रतिक्रिया देऊ नये म्हणून यावेळी विशेष खबरदारी घेण्यात आली होती.
Sanjay Raut
Sanjay Raut Sarkarnama

मुंबई : पत्रा चाळ गैरव्यवहारप्रकरणी आर्थऱ रोड कारागृहात असलेल्या खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या जामीन अर्जावर आज (2 नोव्हेंबर) पुन्हा सुनावणी झाली. आजही न्यायालयाने त्यांच्या जामीन अर्जावरील निकाल राखून ठेवला. आता पुढची सुनावणी येत्या ९ नोव्हेंबर रोजी होणार आहे. दिवाळीपुर्वी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने त्यांना जामीन देण्यास नकार दिला होता. त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली होती. त्यामुळे यावर्षी संजय राऊत यांची दिवाळी ही जेलमध्येच गेली.

गेल्यावेळी जामीनावरील सुनावणी नंतर बाहेर पडताना संजय राऊत यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्याशी भेट झाली होती. त्यानंतर, सर्व काही ओक्के आहे, आपण लवकरच बाहेर येणार, असे संजय राऊत म्हणाल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले. त्यावरुन मोठा गदारोळ झाला होता.

Sanjay Raut
मोठी बातमी ! अवैध खाण प्रकरणी मुख्यमंत्र्यांना ईडीची नोटीस

त्यावरुन "बाहेर लोक राऊत यांना भेटत असतील तर तुमच्या पोटात दुखण्याचे कारण नाही," अशा शब्दात न्यायाधीशांनी पोलिसांचे कान उपटले होते. कोर्टाच्या बाहेरची गर्दी मी नियंत्रणात आणू शकत नाही. बाहेर लोक राऊत यांना भेटत असतील तर तुमच्या पोटात दुखण्याचे कारण नाही. जर कोणी बंदुक, चाकू आणला तर गोष्ट वेगळी आहे' असं म्हणत न्यायाधीशांनी पोलिसांना खडेबोल सुनावले होते.

त्यानंतर आज विशेष म्हणजे, संजय राऊत यांनी माध्यमांशी किंवा कार्यकर्त्यांकडे काही प्रतिक्रिया देऊ नये म्हणून यावेळी विशेष खबरदारी घेण्यात आली होती. राऊतांनी माध्यामांना जाऊ नये म्हणून त्यांच्या आवतीभोवती पोलिसांचा गराडा ठेवण्यात आला होता.

गेल्यावेळी झालेल्या सुनावणीत राऊतांचे वकील अॅड. अशोक मुंदरगी यांनी युक्तीवाद केला होता. अलिबागच्या प्लॉट खरेदी प्रकरणात प्लॉटधारकांच्या जबाबात तफावत आहे. प्रविण राऊतांसोबत झालेल्या कोणत्याही आर्थिक व्यवहारांबाबत आम्ही कोणतीही माहिती लपवून ठेवली नसल्याचे मुंदरगी यांनी सांगितले. पण तपास यंत्रणांनी आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले. आम्ही कोणत्याही प्रकराचे मनी लॉण्ड्रिग किंवा कोणताही गुन्हा केलेला नसल्याचेही मुंदरगी यांनी न्यायालयाला सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in