दसरा मेळाव्यासंदर्भात संजय राऊतांची शिवसैनिकांना महत्त्वाची सूचना?

दसरा मेळाव्यावरुन शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गट समोरा-समोर आले आहेत.
Sanjay Raut
Sanjay Raut Sarkarnama

मुंबई : राज्यातील नाट्यमय संत्तातरणानंतर शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळावा कोण घेणार यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यामध्ये वाद सुरु झाला आहे. दोन्ही नेत्यांच्या समर्थकांकडून आम्हीच मेळावा घेणार असा दावा केला जात आहे. असे असतानाच आता या वादामध्ये आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अटकेत असलेले शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उडी घेतली आहे.

सोमवारी राऊत यांच्या कोठडीमध्ये तीन ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली. यावेळी सुनावणीसाठी न्यायालयामध्ये आलेल्या राऊत यांच्यासोबत त्यांचे बंधू सुनिल राऊत आणि वकील होते. या व्यक्तीरिक्त शिवसेनेचे नेते अनिल देसाई, चंद्रकांत खैरे यांनीही संजय राऊत यांची भेट घेतली. यावेळी दसरा मेळाव्याचा प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना राऊतांकडून देण्यात आल्याचे समजते. या संदर्भातील वृत्त एका वेबसाईटने दिले आहे.

Sanjay Raut
Foxcon: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील युवकांची माफी मागावी!

शिवाजीपार्क मैदानावर मेळावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी वतीने अर्ज केला आहे. मात्र, त्याचवेळी दुसरीकडे शिंदे गटाकडूनही दसरा मेळाव्यासाठी हेच मैदान मिळावे यासाठी प्रयत्न केले जात आहे. न्यायालयामध्ये भेटलेल्या नेत्यांसोबत राऊत यांनी चर्चा करताना दसरा मेळाव्यासंदर्भात भाष्य केले. या विषयाबद्दल बोलताना राऊत म्हणाले, शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होतो. ही परंपरा आहे. परवानगी मिळाली नाही तरी शिवसैनिकांनी पार्कामध्येच मेळावा घ्यावा, असे राऊत म्हणाले.

Sanjay Raut
शिंदे गटात शह-कटशह : कोकाटे, ठोंगे, साठेंच्या निवडीनंतर सावंत गटाची मुख्यमंत्र्यांकडे धाव

शिवसेनेत अभूतपूर्व फुट पडल्यानंतर हा पहिलाच मेळावा असणार आहे. त्यामुळे आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा शिंदे गट करत आहे. तो दावा अधीक मजबूत करण्यासाठी शिवाजीपार्कमध्येच दसरा मेळावा घेण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न आहे. तर दुसरीकडे शिवसेनेनेही दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवाजीपार्कमध्ये मेळावा घेण्यासाठी अर्ज केला आहे. बीकेसीमधील मैदानावर मेळावा घेण्यासाठी शिंदे गटाला परवानगी मिळाली आहे. मात्र, मुंबई महानगरपालिकेने अद्याप शिवाजी पार्कसंदर्भात कोणताही निर्णय दिलेला नाही, त्यावरुन आता शिवसेनेचे नेते अधिक आक्रमक होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com