Sanjay Raut Announcement: केरला स्टोरी'च्या धर्तीवर संजय राऊतांची 'डायरी ऑफ महाराष्ट्र खोका' चित्रपटाची घोषणा

Maharashtra Politics| शिंदे गट हा कोणताही पक्ष नसून भाजपने पाळलेला कोंबड्यांचा खुराडा आहे
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama

Sanjay Raut on Diary of Maharashtra Khoka देशात, केरला स्टोरी चित्रपटावरुन राजकारण तापलं असताना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठी घोषणा केली आहे. देशात केरला स्टोरी सारखे चित्रपट येत असतील आम्ही ' डायरी ऑफ महाराष्ट्र खोका' असा चित्रपट काढणार आहे. चित्रपट दिग्दर्शत विवेक अग्नीहोत्रींना याची स्टोरी देणार आहे. असंही राऊत यांनी म्हटलं आहे. हा एक ऐतिहासिक चित्रपट असेल आणि त्यात माणसं कमी आणि खोके जास्त असतील, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला आहे. (Sanjay Raut's 'Diary of Maharashtra Khoka' movie announced on the lines of 'Kerala Story')

Sanjay Raut
Nine Years Of Modi Govt : 'खोट्या आश्वासनांची नऊ वर्ष पूर्ण ; काँग्रेसचा भाजपवर घणाघात..

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर निशाणा साधला आहे. शिंदे गट हा कोणताही पक्ष नसून भाजपने पाळलेला कोंबड्यांचा खुराडा आहे. त्या कधीही कापल्या जातील. पक्ष म्हणून त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा नाही. निवडणूक आयोगाने एखादा निर्णय विकत दिला म्हणून तो पक्ष होत नाही, अशा शब्दांत शिंदे गटाला पुन्हा डिवचलं आहे. (Political News)

Sanjay Raut
Dispute in Congress : नाना पटोलेंविरोधात असंतोष वाढला;काँग्रेसचे बडे नेते भेटले हायकमांडला

 शिवसेनेच्या शिंदे ( Eknath Shinde) गटाची लोकसभेसाठी तयारी सुरु झाली आहे. यावेळी त्यांनी २२ ते २३ जागांची मागणी केली आहे. या सर्वांवर सुरु अससेल्या चर्चेवर संजय राऊतांनी निशाणा साधला आहे. शिंदे गटाने ४८ जागा लढाल्याने आम्हाला काहीही फरक पडत नाही. मागच्या म्हणजेच आताच्या लोकसभेत आमचे १९ खासदार आहेत. आहेत. त्यापैकी १८ महाराष्ट्रात आणि एक दादरा नगर हवेलीतूल आहे. त्यामुळे आमचा १९ खासदारांचा आकडा लोकसभेत कायम राहिल, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com