लग्न संजय राऊतांच्या लेकीचे अन् चर्चा मात्र #PMkiShaadi ची

पूर्वशी-मल्हार यांचा हळदी समारंभ, संगीत कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.
Sanjay Raut
Sanjay Rautsarkarnama

मुंबई : शिवसेनेचे (ShivSena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या मुलीच्या लग्नाची राज्यभरात चर्चा आहे. राऊत यांची कन्या पूर्वशी यांचा ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी विवाह होणार आहे. सोमवारी हा लग्नसोहळा पार पडणार आहे. सध्या पूर्वशी-मल्हार यांचा हळदी समारंभ, संगीत कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. मात्र, सध्या राऊत यांच्या कन्येची लग्नपत्रिका सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या पत्रिकेवरील #PMkiShaadi (पीएम की शादी) हा हॅशटॅग सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

Sanjay Raut
पुन्हा लॅाकडाऊन नको असेल तर बंधने पाळावीच लागतील; मुख्यमंत्र्यांचा इशारा

संजय राऊत कन्येच्या लग्नसोहळ्यात सध्या व्यस्त आहेत. प्रत्यक्ष लग्न समारंभाआधी संगीत कार्यक्रम, हळदी समारंभ असे कार्यक्रम धुमधडाक्यात साजरे झाले. वधू आणि वर म्हणजेच पूर्वशी राऊत आणि मल्हार नार्वेकर यांच्या चेहऱ्यावरील आनंददेखील ओसंडून वाहत आहे. या लग्न समारंभाला अनेक बड्या व्यक्तींना आमंत्रण देण्यात आले आहे. त्यासाठी एक खास लग्नपत्रिका छापण्यात आली आहे. हीच लग्नपत्रिका सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

लग्न पत्रिकेमध्ये पूर्वशी आणि मल्हार यांचे इंग्रजीत नाव आहे. पूर्वशी (Purvashi) या इंग्रीजी नावातील पी (P) तसेच मल्हार (Mahlar) या नावातील एम (M) या अक्षरांना घेऊन हॅशटॅग तयार करण्यात आला आहे. या दोन्ही नावांच्या आद्यक्षरांना घेऊन लग्नपत्रिकेवर #PMkiShaadi असे छापण्यात आले आहे. त्यामुळे हा हॅशटॅग चर्चेचा विषय ठरला आहे.

Sanjay Raut
रोखठोक संजय राऊतांचे व्याही सनदी अधिकारी; जावई काय करतो?

संजय राऊत यांच्या कन्येचा लग्नसोहळा 29 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. त्याआधी आज (ता. 28) प्रसिद्ध शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांच्या संगीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पूर्वशी राऊत यांचे पिता संजय राऊत यांच्यासह दोन्ही काकाही भावूक झाल्याचे दिसले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com