Sanjay Raut News| संजय राऊतांवरील अब्रुनुकसानीच्या दाव्याची सुनावणी पुढील महिन्यात

Sanjay Raut News | संजय राऊत यांनी मेधा सोमय्यांवर 100 कोटींचा शौचालय घोटाळा केल्याचा आरोप केला आहे.
Sanjay Raut
Sanjay Raut Sarkarnama

Sanjay Raut News | मुंबई : मेधा किरीट सोमया यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवरील पुढील सुनावणी 14 डिसेंबर रोजी होणार आहे. संजय राऊत यांनी १०० कोटींच्या शौचालय घोटाळा प्रकरणी मेधा सोमय्या आणि किरीट सोमय्या यांच्यावर आरोप केले होते. यावर मेधा सोमया यांनी त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केला होता. या प्रकरणी आज शिवडी न्यायालयात सुनावणी पार पडली. पण संजय राऊत हे सध्या ईडी कोठडीत असल्याने आज ते सुनावणीस हजर राहt शकले नाहीत.

शिवडी दंडाधिकारी न्यायालयाने संजय राऊत यांच्या वकिलांना आरोपा संदर्भातआवश्यक कागदपत्रे कोर्टासमोर सादर करण्यास सांगितले आहे. संजय राऊत यांनी मेधा सोमय्यांवर 100 कोटींचा शौचालय घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. पण या आरोपात तथ्य नसल्याचा दावा सोमय्या तर्फे करण्यात आला होता. संजय राऊत यांच्या विरोधात मेधा सोमय्या यांनी शिवडी महानगर दंडाधिकारी कोर्टात याचिका दाखल केली. या प्रकरणावर आज सुनावणी पार पडली.

Sanjay Raut
भाजपच्या कारभाराची सत्ताधारी, विरोधकांकडून चिरफाड!

२९ सप्टेंबरला झालेल्या सुनावणीवेळी १ नोव्हेंबरपासून याखटल्याची नियमित सुनावणी घेण्याचेही शिवडी न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट केले होते. मेधा सोमय्या यांनी केलेले आरोप आपल्याला मान्य नसल्याचे गेल्यावेळी झालेल्या सुनावणीत राऊत न्यायालयाला सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर शिवडी न्यायालयाने १ नोव्हेंबरपासून राऊत यांच्या विरोधातील खटला सुरू करण्यात येईल. तसेच खटल्याची नियमित सुनावणी होईल, असे महानगरदंडाधिकारी पी. आय. मोकाशी यांनी सांगितले होते.

काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्याविरोधात अब्रूनुकसाना दावा केला होता. संजय राऊत वारंवार मेधा सोमय्या यांनी टॉयलेट घोटाळ्यात भ्रष्टाचार केल्याचा दावा केला होता. सोमय्यांनी या योजनेत अनेक कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप राऊतांनी म्हटले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com