संजय राऊतांचा बंडखोरांना टोला : आता ते म्हणतील आम्हीच बाळासाहेबांना शिवसेनेत आणले

शिंदे गटातील आमदारांनी राज्यातील राजकीय परिस्थितीचे खापर खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांच्यावर फोडण्यास सुरवात केली आहे.
Sanjay Raut Latest Marathi News
Sanjay Raut Latest Marathi News Sarkarnama

मुंबई - राज्यातील शिवसेनेत दोन गट पडले आहेत. त्यामुळे राज्यातील उद्धव ठाकरे मुख्यमंत्री मंत्री असलेली महाविकास आघाडीची सत्ता गेली. शिंदे गटाने भाजप बरोबर सत्ता मिळविली. शिंदे गटातील आमदारांनी राज्यातील राजकीय परिस्थितीचे खापर खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांच्यावर फोडण्यास सुरवात केली आहे. या टीकेला खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. ( Sanjay Raut's attack on the rebels: Now they will say that we brought Balasaheb to Shiv Sena )

संजय राऊत म्हणाले, देशभरात ज्या ज्यावेळी पक्ष फोडण्यात आले त्यावेळी फुटीर गटाने हकालपट्टी केलेल्या नेत्यांना स्थान दिले आहे. जे म्हणतात आमचीच शिवसेना खरी त्यातील बरेच जण राजीनामा देताना शिवसैनिकांना काय म्हणत आहेत. ते म्हणतात, आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो. याचा अर्थ शिवसेना मूळ आहे. हे गोंधळलेल्या मनस्थितीचे लक्षण आहे. हा गोंधळ असाच काही काळ राहील. मात्र महाराष्ट्रातील जनता गोंधळलेली नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

Sanjay Raut Latest Marathi News
एक संजय तो गया दुसरा जल्द ….; मोहित कंबोज यांना नक्की म्हणायचंय काय?

ते पुढे म्हणाले की, खऱ्या खोट्या शिवसेनेचा हा मामला नाही. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची आहे. आता हे बंडखोर असेही म्हणतील की आम्हीच बाळासाहेब ठाकरे यांना शिवसेनेत आणले. उद्धव ठाकरे यांना आम्हीच शिवसेना प्रमुख बनविले असे ते काहीही म्हणू शकतात. अशा वक्तव्यांकडे लक्ष न देणेच योग्य आहे, अशी उपहासात्मक टीकाही त्यांनी केली.

त्यांच्या मनाची अवस्था आम्ही समजू शकतो. कायदा आमच्या बरोबर आहे. आम्हाला विश्वास आहे, की सर्वोच्च न्यायालयात आम्हाला न्याय मिळेल. देशातील लोकतंत्र अजून मेलेले नाही. देशाचे मुख्य न्यायाधीश हे दाखवून देतील, असे त्यांनी सांगितले.

Sanjay Raut Latest Marathi News
शिवसेनेची स्थिती पाहून संजय पवार ढसाढसा रडले : म्हणाले, असे पोपट परत घेऊ नका

2014मध्ये आम्ही भाजपबरोबरील युती तोडली नाही. भाजपनेच शिवसेनेबरोबरील युती तोडली. 2019मध्येही आम्ही युती तोडली नव्हती. भाजपचीच चाल होती की, आम्हाला युतीपासून दूर करावे. त्यामुळे शिवसेनेतून गेलेले 12 ही खासदार त्यावेळी तोंडाला चिगडपट्टी लावून गप्प बसले. आता ते बोलत आहेत. कोणीही काही करून द्या दुनिया सत्याची आहे. सत्यमेव जयते. मी पक्षाचे नेतृत्त्व करतो म्हणून कोणी मला तुरुंगात टाकणार असेल तर मी तयार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेल्या टीकेवर संजय राऊत यांनी सांगितले की, त्यांच्या चिखल फेकीला, आरोपांना काही अर्थ नाही. कालपर्यंत ते आमचे सहकारी होते. मी त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची टिपण्णी करणार नाही. त्यांची मजबुरी मला माहिती आहे, असा टोलोही त्यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com