Sanjay Raut On Modi's Mumbai Visit: '' हे प्रचाराचं भूमिपूजन..!''; पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यावरुन संजय राऊतांचा भाजपला टोला

PM Narendra Modi Mumbai Visit: शिवसेनेनं केलेल्या विकासकामांच्या उद्घाटनासाठी भाजपनं पंतप्रधानांना मुंबईत निमंत्रित केलं आहे.
Narendra Modi, Sanjay Raut, Devendra Fadnavis
Narendra Modi, Sanjay Raut, Devendra FadnavisSarkarnama

Sanjay Raut On PM Narendra Modi Mumbai Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (दि.१९) मुंबई दौर्यावर येत आहेत. यावेळी मोदींच्या हस्ते विविध विकासकामांचं भूमिपूजन करण्यात येणार आहे. मोदीच्या स्वागतासाठी भाजप आणि शिंदे गटानं जोरदार तयारी देखील केली आहे. हा पंतप्रधानांचा दौरा आगामी काळात होणार्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा भाग आहे अशी टीका विरोधकांकडून होत आहे.आता ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनीही मोदींच्या मुंबई दौर्यावर निशाणा साधला आहे.

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. राऊत म्हणाले,पंतप्रधानांनी कर्नाटकातून येताना बेळगाव व इतर सीमावर्ती भागात मराठी भाषिकांवर होणार्या अत्याचाराबाबत तेथील मुख्यमंत्र्याना सूचना करावी. यापुढे बेळगावमधील मराठी बांधवांवरती अत्याचार करू नका अशा सूचना तिकडच्या मुख्यमंत्र्यांना दिल्या पाहिजे.याची घोषणा महाराष्ट्रात करावी याचा आम्हाला आनंद होईल. पंतप्रधानाचं स्वागत कायम केलं पाहिजे. त्याला कोणीही विरोध करु शकत नाही असेही संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावेळी सांगितले.

Narendra Modi, Sanjay Raut, Devendra Fadnavis
Ambadas Danve: '' निवडून आलात धनुष्यबाणावर आणि उंबरे झिजवता भाजपाई मंडळींचे..?''; अंबादास दानवेंचा हल्लाबोल

राऊत म्हणाले, शिवसेनेनं जी अगोदर कामं मुंबईत केली आहेत त्याचंच भूमिपूजन करण्यासाठी भाजपनं पंतप्रधान मोदींना निमंत्रित केलं आहे. कारण शिवसेनेचं सरकार असताना महापालिकेनं विविध प्रकल्पाची योजना, पायाभरणी, सुरुवात, अनेक अडथळे पार करून केली आहे. याच कामांचं उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान येत आहेत हे शिवसेनेचं यश आहे.

शिवसेनेनं सुरू केलेला कामांना गती मिळाली, त्यामुळे भारतीय जनता पार्टीला त्यांच्या प्रचाराचं भूमिपूजन करता येत आहे. हे प्रचाराचं भूमिपूजन आहे असा टोलाही संजय राऊतांनी यावेळी भाजपला लगावला आहे.

Narendra Modi, Sanjay Raut, Devendra Fadnavis
Narendra Modi News : मोदींचे मराठीतून टि्वट , म्हणाले, "मी मुंबईत असेन.."

पंतप्रधान मोदींचं मराठीत टि्वट..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास मराठीत ट्विट केलं आहे. मी मुंबईत असेन. 38,000 कोटी रु. खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी यावेळी केली जाणार आहे. यामध्ये मेट्रो कनेक्टिव्हिटी सुधारणे, रेल्वे पायाभूत सुविधा, सांडपाणी प्रक्रिया तसेच आणखी कामांचा समावेश आहे. या कामांमुळे राहणीमानाचा दर्जा उंचावण्यास चालना मिळेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

पंतप्रधानांच्या या ट्विटला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रिप्लाय दिला आहे. मुंबई नगरीत आपले मन:पूर्वक स्वागत आहे. आपल्या शुभ हस्ते मुंबईतील विविध महत्त्वकांक्षी प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in