Sanjay Raut : शिंदे गटात गेलेल्या नाशिकच्या शिवसैनिकांबाबत संजय राऊतांचं मोठं विधान

Sanjay Raut News : 'काही बेनामी लोक सोडून गेले ते कचरा आहेत...'
MP Sanjay Raut
MP Sanjay RautSarkarnama

Sanjay Raut News : नाशिकमधील काही बेनामी लोक सोडून गेले, मात्र जे लोक गेले ते कचरा आहेत, असं म्हणत नाशिकमधील ठाकरे गटाचे काही नेते शिंदे गटात गेले त्यांच्यावर संजय राऊतांनी टीका केली. ते आज नाशिकच्या दौऱ्यावर जात असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

तसेच उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक वाढवण्यासाठी मुंबईत आलेले योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) पाच लाख कोटींची गुंतवणूक घेऊन गेले. मग तुम्ही काय करताय? असा सवालही यावेळी संजय राऊत यांनी शिंदे - फडणवीस सरकारला केला.

योगी आदित्यनाथ हे मुंबईच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी अनेक उद्योजकांच्या भेटी घेत उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. तसेच यावेळी पाच लाख कोटींची गुंतवणूक ते घेऊन गेले आहेत. यावरून खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली.

MP Sanjay Raut
Jalgaon News : आयुक्तपदाचा तिढा सुटता सुटेना ; प्रशासकीय कामे खोळंबली!

संजय राऊत म्हणाले, ''नाशिकमधील काही बेनामी लोक सोडून गेले. जे लोक गेले ते कचरा आहेत. मात्र या कचऱ्यापुढे मुख्यमंत्री भाषण करतात हे दुर्देव आहे'', असं म्हणत त्यांनी ''महाराष्ट्रात टोळी युद्ध सुरू आहे, त्याबाबत कोणी आवाज काढतंय का?'', असा सवाल केला.

तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी संजय राऊतांना पुन्हा एकदा तुरूंगात जाण्यासाठीचा रस्ता मोकळा करत असल्याचं विधान केले. त्यावर संजय राऊतांनी प्रत्युत्तर देत राणेंच्या इशाऱ्यानंतर पलटवार केला.

MP Sanjay Raut
Pandharpur news : पांडुरंगाला वाहिलेले पोतेभर दागिने निघाले खोटे; कुणी कुणाला फसवलं; सराफांनी भक्तांना की....

नारायण राणेंच्या विधानावर बोलताना राऊत म्हणाले, ''आम्ही त्यांच्यासारखे डरपोक आणि पळपुटे नाहीत. ईडीची नोटीस येताच पक्ष बदलणारे आम्ही नाही. मी माझ्या पक्षासाठी हिमतीने जेलमध्ये गेलोय, तुमच्या सारखा पळून गेलो नाही. नामर्द नाही ओत आम्ही. बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. तुमच्या हातात कायदा आहे का मला जेलमध्ये टाकायला. तुम्ही कायद्याचे बाप झालात का'', अशा शब्दात खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नारायण राणेंच्या इशाऱ्याला उत्तर दिले.

MP Sanjay Raut
Chitra Wagh : उर्फी राहिली बाजूला, चित्रा वाघ यांनाच महिला आयोगाची नोटीस!

नारायण राणे नेमकी काय म्हणाले होते?

''26 डिसेंबरच्या सामनातील अग्रलेखाचे सर्व कात्रणे माझ्याकडे आहेत. मी ती वकिलाकडे पाठवून ठेवली आहेत. मी वाचून विसरणार नाही. संजय राऊतांना सोडणार नाही. तर त्यांच्यावर केस करणार आहे. 100 दिवस कमी वाटले म्हणून त्यांना परत जावंसं वाटतयं. त्यामुळे त्यांना रस्ता मोकळा करुन देत आहे,'' असं म्हणत राणेंनी इशारा दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in