Sanjay Raut : '' ...तो प्रश्न तुम्ही श्राद्ध उरकल्याप्रमाणे दोन मिनिटांत आटोपता!''

Sanjay Raut : रस्ता ही काय सीमाप्रश्न सोडवण्याची जागा आहे का?
MP Sanjay Raut
MP Sanjay RautSarkarnama

Sanjay Raut Latest News : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र - कर्नाटक सीमावाद चांगलाच चिघळला आहे. याच पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यातील संबंध देखील बिघडले आहे. मात्र, गुजरात नवीन सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी जात असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची अहमदाबाद विमानतळावर भेट झाली. याच भेटीवरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे.

गुजरातमध्ये भूपेंद्र पटेल यांच्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधीला केंद्रातील महत्त्वाचे मंत्री आणि भाजपशासित अनेक राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित होते. या शपथविधीनंतर अहमदाबाद विमानतळावर या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांमध्ये जवळपास 15 मिनिटं ही चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

MP Sanjay Raut
Maharashtra Political Crises : सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाची मोठी मागणी

संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राऊत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व कर्नाटकच्या मुख्यमंत्री यांच्या भेटीवर सडकून टीका केली आहे.

राऊत म्हणाले, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई रस्त्यावर भेटले असं ऐकलं. रस्ता ही काय सीमाप्रश्न सोडवण्याची जागा आहे का? जाता जाता, चालता चालता, कॉफी शॉपमध्ये, एअरपोर्ट लॉनमध्ये, एअरपोर्टच्या लॉबीत भेटण्याची जागा आहे का? असा सवाल उपस्थित केला.

तसेच ज्या प्रश्नावर लोक ५५-६० वर्षे संघर्ष करत आहेत, लढत आहेत, शहीद होत आहेत, मान-अपमान सहन करत आहेत तो प्रश्न तुम्ही श्राद्ध उरकल्याप्रमाणे दोन मिनिटात आटोपता. चालता चालता बोलायला सीमाप्रश्न इतका खालच्या दर्जाचा वाटला का? असा सवालही राऊतांनी विचारला आहे.

MP Sanjay Raut
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी समजून घेतलं पाहिजे की, कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्रावर हल्ला करत आहेत, बदनामी करत आहेत, धमकी देत आहेत आणि तुम्ही सहज चालता चालता भेटत आहात आणि चर्चा करत आहात. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. त्यांनी हे बाहेर तरी सांगू नये.

यावेळी देशाच्या राज्यकर्त्यांनी राजकारण, तपासयंत्रणा, विधानसभा, विरोधी पक्ष यावर लक्ष देण्यापेक्षा असुरक्षित झालेल्या सीमांवर लक्ष द्यावं असा सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com