'वेट अ‍ॅन्ड वॉच' राऊताचं नवं टि्वट ; राजभवनातील शिंदे-फडणवीसांचा फोटो शेअर

'उनकी मुस्कुराहट पर न जाना, दिया तो कब्र पर भी जल रहा है!!
eknath shinde, devendra fadnavis
eknath shinde, devendra fadnavissarkarnama

मुंबई : "सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाचा निर्णय येईपर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी," अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut)यांनी काल (शनिवारी) केली आहे. त्यानंतर आज त्यांनी पुन्हा एक टि्वट करुन शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. (sanjay raut latest news)

संजय राऊत यांनी राजभवनातील एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस (eknath shinde, devendra fadnavis) यांच्या फोटोसह टि्वट केलं आहे.'उनकी मुस्कुराहट पर न जाना, दिया तो कब्र पर भी जल रहा है!! Wait and watch.' असं टि्वट संजय राऊतांनी केले आहे.

सत्तास्थापनेचं पत्र राज्यपालांना देतानाचा एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांचा फोटो ट्वीट केला आहे.'या फोटोतील त्यांच्या हास्य मुद्रेवर जाऊ नका दिवा तर कबरीवर देखील तेवत असतो' असं त्याच्या कॅप्शन मध्ये राऊतांनी म्हटलं आहे. यामध्ये 'वेट अ‍ॅन्ड वॉच' असं लिहलं आहे. त्यामुळे आता राऊत येत्या काही दिवसात कोणता नवीन गौप्यस्फोट करतात, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

eknath shinde, devendra fadnavis
शिंदे सरकारचा अजितदादांना दणका ; बारामतीतील २४५ कोटींच्या कामांना स्थगिती

संजय राऊत यांनी काल टि्वट करून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari) यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची विनंती केली आहे.त्यांनी आपल्या ट्विटमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीचा फोटोही शेअर केला आहे. राज्य घटनेनुसार चालत आहे का?, असा सवालही संजय राऊत यांनी राज्यपालांना केला

"बार्बाडोस सारख्या देशात जिथे लोकसंख्या अवघी अडीच लाख आहे तिथे 27 मंत्री आहेत. पण महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटी असूनही येथील मंत्रिमंडळात केवळ 2 जण आहेत. हे दोन्ही मंत्री राज्याशी संबंधित सर्व निर्णय घेत आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाचा निर्णय येईपर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी," अशी मागणी राऊतांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com