हे लोक रोज म्हणतात, संजय राऊतांना अटक करू; मी बसलो आहे, कधी अटक करणार?

Sanjay Raut | Shivsena : संजय राऊत यांचे आव्हान
Sanjay Raut Latest News
Sanjay Raut Latest News Sarkarnama

(Shivsena leader Sanjay Raut Latest news)

पुणे : मागील काही काळापासून शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यामागे ईडी कारवाईचा ससेमिरा लागला आहे. त्यांची संपत्ती देखील ईडीने जप्त केली आहे. याशिवाय विरोधी पक्षांकडून सातत्याने राऊत यांना अटक होणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान या सर्व कारवाईवर, हे लोक रोज म्हणतात, संजय राऊतांना अटक करू, मी बसलो आहे, कधी करणार सांगा? असं म्हणतं आता खुद्द राऊत यांनीच आव्हान दिले आहे.

संजय राऊत पुण्यात एका मुलाखतीच्या कार्यक्रमादरम्यान बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंतही उपस्थित होते. (Shivsena leader Sanjay Raut Latest news)

यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, माझी नसलेली संपत्ती ईडीने (ED) जप्त केली. माझ्या वडिलोपार्जित घरावर कारवाई केली. माझ्या निकटवर्तीय लोकांवर कारवाई केली. तेव्हा मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना रात्री १२ वाजता फोन केला होता. मी त्यांना म्हटले, मी दिल्लीत बसलो आहे. मला अटक करा. पण माझ्या निकटवर्तीयांना त्रास देऊ नका, असेही राऊत (Sanjay Raut) म्हणाले. (Shivsena leader Sanjay Raut Latest news)

या मुलाखतादरम्यान संजय राऊत यांना, नेहमी तुमच्या आणि महाविकास आघाडीच्या नेत्यावरच धाडी पडतात. भाजपच्या नेत्यांवर धाडी पडत नाही. याचा तुम्हाला त्रास होत नाही का, असा प्रश्न सूत्रसंचालकाने विचारला. त्यावर उत्तर देताना राऊत म्हणाले, "त्रास म्हटलं तर होतो. परंतु, करून घ्यायला नको. याचं आम्ही २०२४ नंतर उत्तर देऊ. सगळ्यांचे दिवस येतात. आमचे पण दिवस येतील".

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com