संजय राऊतांनी भाजपच्या दंडेलशाहीविरूद्ध लढण्याची ठिणगी टाकली : उद्धव ठाकरे

Sanjay Raut| Uddhav Thackeray| संजय राऊत बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक आहेत
Uddhav Thackeray|
Uddhav Thackeray|

मुंबई: ''मला संजय राऊतांचा अभिमान आहे, पण त्यांचा असा गुन्हा काय होता. संजय कट्टर शिवसैनिक आहे. भाजपच्या दंडेलशाहीविरूद्ध लढू शकतो ही ठिणगी टाकली आहे. तो शरण जाऊ शकला असता, पण गेला नाही. राऊतांचं एक वाक्य मला खुप आवडलं मरेल पण शिवसेना सोडणार नाही. राऊतांनी तसेच केले, ते पत्रकार आहेत, बेधडक आहेत. बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक आहेत, अशा शब्दांत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (ङ यांनी संजय राऊतांवरील कारवाईवर प्रतिक्रिया दिली.

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरील कारवाईनंतर आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी रविवारी (३१ जुलै) भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या भाषणातील मुद्दे वाचून दाखवत त्यांच्यावर सडकून टिका केली. ''जेपी नड्डा यांचं वक्तव्य हुकूमशाहीकडे नेणार आहे. सध्याचं राजकारण घृणास्पद झालं आहे. भाजपकडून गुलाम तयार करण्याचं काम सुरु आहे. त्यांंचं काम संपल्यानंतर जुने गुलाम जातील आणि नवीन गुलाम येतील, पण मला राऊतांचा अभिमान आहे. आज तुमच्याकडे बळ आहे. ज्या दिवशी दिवस फिरतील त्या दिवशी सत्य समोर येईल, असा इशाराच त्यांनी दिला.

Uddhav Thackeray|
शिरसाट बदमाशाची औलाद, केसरकर गद्दार ; शिवसेनेचं नावं घेण्याची तुमची लायकी नाही..

जे गेले त्यांच्या सत्तेचा फेस उतरल्यावर त्यांना समजेल. पण मला न्यायदेवतेवर विश्वास आहे. ज्यांना पक्ष संंपवायची हौस असेल त्यांनी जनतेत जाऊन संपवून दाखवा, असे आव्हानही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले. देशात लोकशाहीचे चार स्तंभ आहेत आणि मला या स्तंभांवर विश्वास आहे. पण भाजपकडून बळाचा वापर विरोधकांना वाट्टेल ते करुन अडवायंच अशी परिस्थिती देशात निर्माण झाली आहे. त्यामुळे आता भाजपचा वंश कुठून आला हे ठरवंण गरेजेचं झालं आहे.

भाजपचं राजकारण घृणास्पद झालं आहे. प्रादेशिक पक्ष संपवण्याची सुरुवात भगतसिंह कोश्यारी (राज्यपाल हा शब्द जाणून टाळतो) यांच्या भाषणातून झाली. म्हणजे स्थानिक अस्मिता चिरडून टाकायची, हिंदूंमध्ये फुट पाडायची, भाषिक वाद निर्माण करायचे, मराठी माणसाला चिरडून टाकायचं आणि परत मराठी अमराठी वाद निर्माण करायचे. आपल्या राजकारणाचा हेतू साध्य करायचा आणि आपल्या विरोधात कोणी असतील तर त्यांना चिरडून टाकायचं, असं सध्याचं भाजपचे राजकारण अत्यंत भेसूरपणे जनतेसमोर आलं आहे, असा घणाघातही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in