Sanjay Raut : फुटीर आमदारांच्या कुत्र्या मांजरालाही सुरक्षा, विरोधक वाऱ्यावर; राऊतांचा घणाघात!

Sanjay Raut : नोटांवर बंदी घालण्यात आली, तेव्हा ‌अनेकांचा मृत्यू झाला.
Sanjay Raut | CM Eknath Shinde
Sanjay Raut | CM Eknath ShindeSarkarnama

Sanjay Raut : शिवसेना ठाकरे गटाचे नेते व राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधत शिंदे फडणवीस सरकारवर बरसून टीका केली. तसेच विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या संभाजी महाराजांच्या धर्मवीर वक्तव्याबाबत त्यांना प्रश्न विचारले असता त्यांनी भाजप आणि शिंदे गटाला राज्यपालांच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा घेरले.

राऊत म्हणाले, शिवरायांचा अवमान करणाऱ्या राज्यपालाना परत पाठवले पाहिजे. मात्र याउलट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यपालांचा साधं निषेध सुद्धा करत नाहीत. यावेळी ते वंचितचे प्रकाश आंबेडकराच्या मताशी मी सहमत दर्शवत, नोटांवर बंदी घालण्यात आली, तेव्हा ‌अनेकांचा मृत्यू झाला, नुकसान झाल, असे राऊत म्हणाले. नोटबंदींची मोदींनी सांगितलेली कारण जैसे थे आहे. नोटबंदीनंतरही बनावट नोटा वाढल्या, असा सवाल ही राऊत यांनी विचारला.

Sanjay Raut | CM Eknath Shinde
Sharad Pawar News : छत्रपती संभाजीराजांना 'धर्मवीर' बोलणं चुकीचं नाही ; पवारांची भूमिका!

मुंबई हे देशातील मोठे औद्योगिक शहर आहे. गुंतवणूक बाबतीत चर्चेला विरोध नाही. कोणत्याहीराज्याबद्दल आम्हाला विरोध नाही.मात्र आमचा विकास ओरबाडून नेऊ नका, असे ही राऊत म्हणाले. ठाकरे गटाच्या आमदार राजन विचारे यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरही त्यांनी खोचक भाष्य केले. "फुटीर आमदारांच्या कुत्र्या मांजराला सुध्दा सुरक्षा देतात, परंतु विरोधीपक्षांच्या महत्वाच्या नेत्यांना सुरक्षा नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरातील सुरक्षा बघा," असा टोलाही त्यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com