
Sanjay Raut Reply to Devendra fadnavis : महाविकास आघाडीने मुंबईत काढलेल्या महाविराट मोर्चावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांनी जोरदार टीका केली होती. फडणवीसांनी तर आघाडीचा मोर्चा हा नॅनो मोर्चा होता अशी बोचरी टीका देखील केली आहे. फडणवीसांच्या याच टीकेला ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. (Sanjay Raut Reply to Devendra fadnavis)
संजय राऊत हे सातारा दौर्यावर आहेत. यावेळी ते बोलत होते. राऊत म्हणाले, '' देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अशा प्रकारच्या वक्तव्याची अपेक्षा नव्हती. जर असं वक्तव्य शिवसेनेतून फुटलेल्या 40 आमदार आणि त्यांच्या नेत्यांनी केलं असतं तर त्यांची बुद्धी नॅनो आहे असं म्हणता आलं असतं. पण फडणवीस हे प्रगल्भ राजकारणी आहेत. त्यांनी असं विधान करणं महाराष्ट्राला अपेक्षित नाही. त्यांनी विरोधीपक्षात प्रदीर्घ काळ काम केलं. त्यांना कालचा विराट मोर्चा दिसला नसेल, त्यांनी अनुभवला नसेल तर हे त्यांचं दुर्देव आहे.
ते जर मोर्चा नॅनो आहे, अपयशी आहे असं म्हणत असतील तर मधल्या काळात ते दिल्लीला गेले होते. तिथे त्यांना दिल्लीश्वरांनी जे गुंगीचे इंजेक्शन दिले असेल ते अजून उतरले नाही असा टोला राऊत यांनी लगावला.
उद्धवजींचा पक्ष जसा नॅनो होतोय, तसा...फडणवीसांची बोचरी टीका
तीन पक्ष एकत्र येऊन एवढा लहानसा मोर्चा निघाला. आज कुणी ड्रोन शॉट दाखवू शकलं नाही. सगळे क्लोजअप दाखवत होते. कारण ड्रोन शॉटलायक मोर्चाच नव्हता. आम्हांला हे आधीही माहिती होतं. आम्ही त्यांना विनंती केली होती की आझाद मैदानावर या. पण मोर्चात आझाद मैदानाइतकी संख्या राहणार नाही हे त्यांना माहिती असल्यामुळे जिथे रस्ता निमुळता होतो, अशी जागा त्यांनी निवडली. त्यामुळे या मोर्चाचं कोणतं विराट स्वरूप उद्धवजींना दिसलं? त्यांचा पक्ष जसा नॅनो होतोय, तसा हा मोर्चाही नॅनोच आहे अशा शब्दांत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.