केंद्र सरकार काही वर्षांपासून जनतेला 'एप्रिल फुल'च करतयं- राऊतांचा हल्लाबोल

Modi government| Sanjay Raut| BJP| दोन कोटी बेरोजगारांना नोकर्‍या दिल्या जातील, हे देखील एप्रिल फूल आहे,
Sanjay Raut
Sanjay Raut

मुंबई: ''राज्यकर्ते देशातील जनतेला नेहमीच एप्रिल फुल करत असतात. पाच राज्याच्या निवडणुका झाल्या आणि सरकारने पेट्रोल डिझेलचे भाव वाढवून एप्रिल फुल केलं. जनतेच्या प्रश्नांच्या सोडवण्याच्या बाबतीत वर्षानुवर्षे सरकारचं एप्रिल फूल सुरू आहे. पण आता अच्छे दिन येणार ते देखील एप्रिल फूल आहे. असे म्हणत, शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्रातील मोदी सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

आज सकाळी माध्यमांशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते. 'तुमच्या खात्यात 15 लाख येतील अस सांगण्यात आले, पण गेले सात वर्ष लोक फक्त वाटच पाहत आहेत, ते देखील एप्रिल फूल आहे. दोन कोटी बेरोजगारांना नोकर्‍या दिल्या जातील, हे देखील एप्रिल फूल आहे, पाकव्याप्त काश्मीर हिंदुस्थानात येणार, हे देखील एप्रिल फूल आहे, ते महाराष्ट्रात किंवा राजकारणात आम्ही सुडाचे राजकारण करत नाही असं म्हणतात, हे देखील एप्रिल फूल आहेत, असे म्हणत त्यांनी केंद्र सरकार देशातील जनतेला फसवत असल्याचा अप्रत्यक्ष आरोपच त्यांनी केला आहे.

Sanjay Raut
धनंजय महाडिकांची सारवासारव; वादग्रस्त वक्तव्यावर माफी अथवा दिलगीरी नाही

दरम्यान, वकील सतीश उकेंवरील कारवाईवरही त्यांनी तपास यंत्रणांवर हल्लाबोल केला आहे. नागपूरचे वकील सहज सतीश उकेंवर जी कारवाई झाली, त्यांनी काही अपराध असतील त्यांनी चुकीच्या पद्धतीने जमिनीचे व्यवहार केले असतील, त्यांनी कोणाची जमीन बळकावली असेल त्यांनी कोणाला धमकी दिली असेल तर ते महाराष्ट्र पोलीस तपास करतील. ईडीने खास येऊन तपास करावा असा गुन्हा नाही आहे, राज्याचे पोलिस अशा प्रकारचा गुन्ह्याचा तपास येऊन करतात. सतीश उकेंनी गुन्हा केलाय तर त्यांच्यावर कारवाई व्हावी. त्यांचे काही विरोधक आहे त्यांनी महाराष्ट्र पोलीसात तक्रार करावी, कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे, पण उकेंच्या बाबतीत जे घडत आहे, तो प्रकार घातक आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

''ज्या प्रकारे काश्मीर किंवा उत्तर पूर्व भागात अचानक अतिरेकी घुसून बॉम्ब हल्ले करतात आणि निघून जातात त्याच पद्धतीने केंद्राच्या या कारवाया सुरु आहेत. यातून जर संघर्ष निर्माण झाला तर केंद्र आणि राज्यामध्ये संघर्ष मोठ्या प्रमाणात निर्माण होईल. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्व राज्याच्या कॉंग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे ते यासाठीच. ज्याप्रकारे ईडी सीबीआय इन्कम टॅक्सचा गैरवापर सुरू आहे. त्याविरोधात बिगर भाजपा शासित राज्यात त्याच्याविरुद्ध सगळ्यांनी एकत्र यायला हवं. ''

''सतीश उके गेल्या काही दिवसापासून प्रसिद्धीच्या झोतात आहेत ते महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांवर ती काही आरोप करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई झाली असल्याचा दावाही संजय राऊतांनी केला आहे. सतीश उकेंवर कारवाई व्हायला काहीच हरकत नाही. पण केंद्रीय तपास यंत्रणेचा हस्तक्षेपामुळे या कारवाईवर संशय येत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

कालच या विषयावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. अशा पद्धतीने केंद्रीय तपास यंत्रणा राज्यात घुसतात हे खरंतर महाराष्ट्राच्या गृह खात्यावरच आक्रमण आहे. राज्याची कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी राज्याच्या पोलीस यंत्रणा आहे. त्यांनी यावर गांभीर्यानं लक्ष देणे गरजेचे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com