संजय राऊत म्हणाले, दसरा मेळाव्यावर मुख्यमंत्री घेणार लवकरच निर्णय

शिवसेनेच्या ( Shivsena ) प्रत्येक कार्यकर्त्यासाठी शिवसेनेचा दसरा मेळावा ( Dussehra Melava ) महत्त्वाचा असतो.
Shivsena will hold Dassehra rally in auditorium not at Shivaji Park
Shivsena will hold Dassehra rally in auditorium not at Shivaji Park Sarkarnama

मुंबई : शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी शिवसेनेचा दसरा मेळावा महत्त्वाचा असतो. शिवसेनेच्या स्थापनेपासून दसरा मेळाव्याला आगळेवेगळे महत्त्व आहे. पूर्वी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व आता उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांना संबोधित करतात. संबोधन शिवसेनेची पुढील राजकीय वाटचालीची रुपरेषा ठरवते. Sanjay Raut said, the Chief Minister will take a decision on Dussehra melava soon

मुंबई महापालिका निवडणुकींना सामोरे जाण्यापूर्वी शिवसेनेसाठी ही पहिली जाहीर सभा असणार असली तरी दसरा मेळावा शिवाजी पार्कवर मोकळ्या मैदानात की बंद सभागृहामध्ये होणार, हे मात्र अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र या संदर्भात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सूचक विधान केले आहे.

Shivsena will hold Dassehra rally in auditorium not at Shivaji Park
गुजरातचा मुख्यमंत्री पंतप्रधान होऊ शकतो, मग महाराष्ट्राचा का नाही? ः संजय राऊत

खासदार संजय राऊत म्हणाले, गेल्या वर्षी कोरोनामुळे शिवसेनेचा दसरा मेळावा ऑनलाइन झाला होता. यंदा, मात्र दसरा मेळावा प्रत्यक्ष होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. याविषयी शिवसेनेचे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच निर्णय घेणार आहेत, असे राऊत यांनी सांगितले.

राऊत पुढे म्हणाले, ‘दसरा मेळावा नक्कीच होईल. मात्र तो ऑनलाइन पद्धतीने होणार नाही तर प्रत्यक्षात होईल. कोरोना नियमांचे पालन करून दसरा मेळावा होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर लवकरच निर्णय घेतील,’ असे संजय राऊत म्हणाले.

Shivsena will hold Dassehra rally in auditorium not at Shivaji Park
मी देवेंद्रजींना विचारलंय...हमरीतुमरी किती पातळीपर्यंत करायची? : उद्धव ठाकरे

कोरोनामुळे दसरा मेळावा गेल्यावर्षी प्रथमच ऑनलाइन पार पडला. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे आल्यानंतर होणारा पहिलाच दसरा मेळावा होता, मात्र कोरोनामुळे शिवसैनिकांच्या उत्सवावर विरजण पडले होते.

Shivsena will hold Dassehra rally in auditorium not at Shivaji Park
'मेलेले कॉंग्रेसवाले उद्धव ठाकरेंनी सरकारमध्ये घेतल्यानं जिवंत झाले'

ज्येष्ठ शिवसैनिकांचा आग्रह

यंदा मात्र कोरोना काही प्रमाणात ओसरण्याची चिन्हे दिसू लागल्याने दसरा मेळावा उत्साहात साजरा करण्याचे शिवसेनेचे मनसुबे आहेत. विशेषतः फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने शिवसैनिकांसोबत संवाद साधण्याची ही मोठी संधी असल्याने दसरा मेळावा प्रत्यक्षात व्हावा, असे ज्येष्ठ शिवसैनिकांचे मत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com