'आमचे सरकार पडणार नाही आणि मी झुकणारही नाही!'

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यासह त्यांच्या मित्र परिवारावर १०० कोटींचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा केला असल्याचा आरोप केला आहे.
Sanjay Raut latest news
Sanjay Raut latest newstwitter/@sanjayRaut

मुंबई : जम्बो कोविड सेंटर भ्रष्टाचाराप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit somaiya) यांच्या आरोपांना शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. “गेल्या काही दिवसांपासून, माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर निंदनीय आरोप होत आहेत. माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात असून त्यांची बदनामीही होत आहे. या अट्टल खोटारड्यांना लवकरच कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.” असे ट्विट करत संजय राऊत यांनी विरोधकांना सूचक इशारा दिला आहे. तसेच, लक्षात ठेवा: आमचे सरकार पडणार नाही आणि मी झुकणारही नाही! जय महाराष्ट्र!” असंही संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यासह त्यांच्या मित्र परिवारावर १०० कोटींचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा केला असल्याचा आरोप केला आहे. शिवाय, संजय राऊतांची लवकरच तुरुंगात रवानगी होणार असल्याचं देखील सोमय्या यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान, किरीट सोमय्या आणि भाजपाकडून होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक सूचक ट्वीट केलं आहे.

Sanjay Raut latest news
हिजाबवरुन आव्हाडांचा भाजपला टोला ; म्हणाले,''केंद्रात एक मंत्रीच करा''

संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांनी बनावट कंपनीच्या आधारे मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स आणि मुलंड, दहिसर, वरळी या भागातील कोविड सेंटर्सचं कंत्राट मिळवलं. मुंबईतील कोविड सेंटर्सच्या माध्यमातून १०० कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. तसेच, सुजित पाटकर यांनी बनावट कंपनीच्या आधारे मुंबईतील कोविड सेंटर्समध्ये डॉक्टर्स पुरवण्याचे कंत्राट मिळवल्याचेही त्यांनी म्हटले होते. पाटकर हे संजय राऊत यांच्या वाइन व्यवसायातही भागीदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) सुजीत पाटकर यांच्या मालमत्तांवर छापा टाकला. या छाप्यात मुंबईतील कोविड सेंटर्सची कागदपत्रे जप्त केल्याची माहितीही पुढे आली होती. या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी केलेली आहे.

किरीट सोमय्यांकडून होणाऱ्या आरोपांबाबत संजय राऊत यांना विचारले असता उत्तर देताना राऊत म्हणाले की, “माझी संपत्ती काय असेल ती त्यांनी घेऊन टाकावी. तुमच्या संपत्त्या काय आहेत ते बघा. मी मराठी माणूस आहे, माझी महाराष्ट्रातच संपत्ती असायला हवी. पण ती नाही. मराठी माणसाच्या हातात पैसे खेळू नये यासाठी षडयंत्र आहे” असा पलटवार संजय राऊत यांनी केला होता.

दरम्यान, राऊतांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर (Sujeet Patkar)यांनी बनावट कंपनी स्थापन करुन मुंबईतील कोव्हिड सेंटर्समध्ये डॉक्टर्स पुरवण्याचे कंत्राट मिळवल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. याप्रकरणी पाटकर यांनी सोमय्यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. सोमय्यांनी राऊत (Sanjay Raut)आणि त्यांच्या कुटुंबीयांवर 100 कोटींच्या जंबो कोविड केअर सेंटर घोटाळ्याचा आरोप केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com