Maharashtra Politics : शिंदे गटाची नवी खेळी; संजय राऊतांसह चतुर्वेदी अन् अनिल देसाईंची कोंडी

Thackeray group : संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदी आणि अनिल देसाईंच्या अडचणी वाढण्याची शक्यता
Sanjay Raut, 
Anil Desai, Priyanka Chaturvedi
Sanjay Raut, Anil Desai, Priyanka ChaturvediSarkarnama

Shivsena : एकनाथ शिंदेंना शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणं बदलली आहेत. याच पार्श्वभूमीवर आता शिंदे गट पुन्हा एकदा नवी खेळी करण्याची शक्यता आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या व्हिपबाबतच्या निर्णयानंतर शिंदे गट ठाकरे गटातील राज्यसभेचे खासदार संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदी आणि अनिल देसाई यांची कोंडी करण्याची शक्यता आहे. शिवसेना पक्षाच्यावतीने त्यांच्यावर कारवाईसाठी राज्यसभा अध्यक्षांना पत्र दिलं जाऊ शकतं, अशी चर्चा सुरू आहे.

Sanjay Raut, 
Anil Desai, Priyanka Chaturvedi
Pimpri-Chinchwad : प्रशासकीय राजवट नको रे बाबा म्हणण्याची आली वेळ

ठाकरे गटाच्या या तीन राज्यसभा खासदारांवर पक्षविरोधी कृती केल्याचा ठपका ठेवत कारवाई करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदी आणि अनिल देसाई यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

पक्षाच्या बैठकीला उपस्थित न राहणं, पक्षाच्या विरोधात वक्तव्य करणं, पक्ष विरोधी कृती करणं अशा अनेक कारणाचा ठपका शिंदे गट राऊतांसह चतुर्वेदी आणि देसाई यांच्यावर ठेवण्याची शक्यता आहे.

Sanjay Raut, 
Anil Desai, Priyanka Chaturvedi
Pimpri Chinchwad : स्वकीयांनीही जगताप कुटुंब फोडण्याचे प्रयत्न केले; शंकर जगतापांचा रोख कुणाकडे?

मात्र, याबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या १७ मार्चच्या सुनावणीनंतरच घेण्यात येण्याची शक्यता आहे. कारण १७ मार्चच्या सुनावणीवर ठाकरे गटाचे काय होणार? तसेच व्हिप कुणाचा लागू होणार? यासह अनेक प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे. त्यामुळे याचा फैसला आल्यानंतरच शिंदे गट पुढची खेळी करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com