Sanjay Raut : राज ठाकरेंवर राऊतांचा हल्लाबोल ; म्हणाले, "मला त्यांना सांगायचयं.."

Sanjay Raut : राज ठाकरेंच्या टीकेला राऊतांनी प्रत्युत्तर दिले आहे.
Raj Thackeray, Sanjay Raut,
Raj Thackeray, Sanjay Raut, Sarkarnama

Sanjay Raut: ठाकरे गटाचे नेते संजय राऊत तब्बल 102 दिवसांनंतर कारागृहातून सुटले आहेत. आज राऊतांनी माध्यमांशी थेट संवाद साधला. यावेळी "राज्याचा कारभार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच चालवत आहेत. लवकरच त्यांची भेट घेणार," असा टोला राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंना लगावला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर राऊतांनी हल्लाबोल केला. (Sanjay Raut latest news)

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर संजय राऊतांच्या ईडी चौकशीला वेग आला होता. तेव्हा राऊत हे भाजप, तपास यंत्रणांवर टीका करीत होते. त्यावेळी राज ठाकरे यांनी राऊतांना टोला हाणला होता. "राऊतांनी एकांतात भिंतीकडे पाहून स्वत:शी बोलण्याची सवय करावी," असे राज ठाकरे म्हणाले होते. राज ठाकरेंचा या टीकेला राऊतांनी आज प्रत्युत्तर दिले आहे.

Raj Thackeray, Sanjay Raut,
Sanjay Raut : जेलबाहेर येताच पहिल्याच पत्रकार परिषदेत राऊतांनी केलं फडणवीसाचं कौतुक

राऊत म्हणाले, "आमचे मित्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माझ्यावर टीका करताना राऊतांना ईडीकडून अटक होईल त्यांनी एकांतात स्वत:शी बोलण्याची प्रॅक्टिस करावी असं म्हटलं होतं. मला त्यांना सांगायचं आहे, मला बेकायदेशीर अटक झाली,असं कोर्टाचं म्हणणं आहे. राजकारणामध्ये शत्रूच्याबाबतही आपण असं चिंतू नये की तो जेलमध्ये जावा. मी एकांतात होतो, जसं सावरकर होते, वाजपेयी होते. मी माझा एकांत सत्कारणी लावला,"

"माझा जेलमधील प्रवास खडतर होता. जेलमध्ये राहणं आनंदाची बाब नाही. मोठमोठ्या भिंती असतात, त्या भिंतींशी बोलावं लागतं. वीर सावरकर , लोकमान्य टिळक, अटल बिहारी वाजपेयी जेलमध्ये कसे राहिले असतील?" असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.

"ईडीवर मी काहीही टीप्पणी करणार नाही. कुणाविरोधातही माझी खंत नाही, तक्रार नाही. माझ्या सुटकेमुळे संपूर्ण देशात चांगले वातावरण तयार झाले आहे. ज्यांनी माझ्याविरोधात कटकारस्थान रचले,त्यांच्याही आनंदात मी सहभागी आहे.राजकारणी लोकांना एकदा तरी तुरुंगात जावच लागत. मीही गेलो. मात्र, या काळात कुटुंबाने खुप काही भोगलं," असे राऊत म्हणाले.

नरेंद्र मोदी, फडणवीस, शहांना भेटणार

महाराष्ट्रात सर्वच नेते एकमेकांशी सातत्याने भेट घेत असतात. मीदेखील देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचीही लवकरच भेट घेणार आहे. माझी सुटका झाल्याने देशाच्या न्यायव्यस्थेवरील आपला विश्वासही वाढला असल्याचे राऊत म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com